सध्या “गुइलेन-बॅरे सिंड्रोम” हा आजार चर्चेत आला आहे कारण त्यामुळे काही नागरिकांचा जीव गेला आहे. तसेच ह्या आजाराने त्रस्त असलेली रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. म्हणूनच आपण आज आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ह्या आजाराबद्दल जणू घेणार आहोत.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम, ज्याला सहसा GBS म्हणून संबोधले जाते, हा एक स्वयंप्रतिकार (autoimmune ) विकार आहे जो परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करतो. हा आजार गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्राला माहिती आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून ह्याचे रुग्ण ही नेहमी महाराष्ट्रभरच् काय तर देशभर दरवर्षी पाह्यला मिळतात.
हा अचानक प्रकट होऊ शकतो आणि वेगाने वाढू शकतो , म्हणूनच लवकर निदान आणि उपचार आवश्यक आहे. GBS ची सुरुवात सामान्यत: खालच्या अंगात मुंग्या येणे आणि कमकुवतपणाच्या संवेदनांनी चिन्हांकित केले जाते. ही लक्षणे त्वरीत शरीराच्या वरच्या भागात पसरू शकतात, ज्यामुळे गंभीर प्रकरणांमध्ये संपूर्ण पक्षाघात होण्याची शक्यता असते.
Table of Contents
ह्या आजाराला गुइलेन-बॅरे सिंड्रोम हे नाव कसे पडले ते पाहू :
1916 मध्ये युरोपातल्या battle of the somme मध्ये दोन सैनिक पॅरालाईज झाले. एक विशिष्ट कारणामुळे हे झाल्याचा निष्कर्ष “गीलियन आणि बारे” या तेव्हाच्या दोन फ्रेंच लष्करी न्यूरोलोजिस्टनि काढला. याच आजाराला आज गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain Barré Syndrome किंवा GBS) संबोधले जाते.
हा आजार संसर्गजन्य आहे का?
नाही, हा संसर्गजन्य आजार नाही अश्या रुग्णाच्या संसर्गात आल्याने इतर व्यक्तीला याची लागण होत नाही परंतु याची उत्पत्ति ही infective म्हणजे जंतु पासून होणाऱ्या आजारपासून आहे.
हा आजार कशामुळे होतो ?
हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारण 78 हजार लोकांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो. आणि तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हे होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते.
Campylobacter Jejuni किवा नुरोवायरस सारख्या बॅक्टेरियाच्या किवा वायरस इन्फेक्शनमुळे गैस्ट्रोएंटेराइटिस होतो. यामुळे मळमळणं, उलट्या, जुलाब होतात. गीयन बारे सिंड्रोममधील हे सामान लक्षण आहे. काहीना फ्लू वा व्हायरल इन्फेक्शन्सनंतरही गीयन बारे सिंड्रोम होण्याची शक्यता असते.
काही दुर्मिळ घटनांमध्ये झिका-चिकनगुनिया झाल्यानंतर, लसीकरणानंतर, शस्त्रक्रियेनंतर वा एखाद्या वैद्यकीय प्रक्रियेनंतर किंवा दुखापतीनंतर GBS होण्याची शक्यता असते. म्हणजेच हा post-infective autoimmune परंतु कम्युनिकेबल किवा संसर्गजन्य नाही.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम मुळे नक्की काय होते?
- परकीय विषाणू वा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. परिणामी नसांना प्रभावीपणे संदेश पाठवता येत नाहीत. आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात.
- त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो.
- थकवा, हातापायाला मुंग्या येणं – झिणझिण्या येणं हे याचं लक्षण असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं हात – चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते.
- यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाता- पायांतला त्राण जातो वा संवेदना जातात, श्वास घ्यायला – गिळायला त्रास होतो.
- या आजारात अशक्तपणाची तीव्रता वाढत जाते. 30 टक्के लोकांमध्ये आजाराची तीव्रता जास्त जाणवते, मात्र ते बरे होतात.”
कोणत्या वयोगटातील लोकाना याचा त्रास जाणवू शकतो ?
कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये (Adults) आणि त्यातही पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलंय.
जीबीएस जसजशी वाढत जाईल तसतसे खालील लक्षणे दिसू शकतात:
- स्नायूंचा कमकुवतपणा: सामान्यतः पायापासून सुरू होते आणि वरच्या शरीरावर चढते.
- बधीरपणा आणि मुंग्या येणे: अनेकदा बोटे आणि बोटांमध्ये सुरू होते.
- अस्थिर चालणे: स्नायूंच्या कमकुवतपणामुळे चालण्यास त्रास होतो.
- डोळ्यांच्या किंवा चेहऱ्याच्या हालचालींमध्ये अडचण: बोलणे, चघळणे किंवा गिळणे यासह.
- तीव्र वेदना: ते दुखणे किंवा क्रॅम्पसारखे वाटू शकते, सामान्यतः पाठ, पाय किंवा हातांमध्ये.
- मूत्राशय आणि आतड्यांचे बिघडलेले कार्य: जसे की लघवी किंवा आतड्यांसंबंधी हालचाल नियंत्रित करण्यात अडचण.
- रॅपिड हार्ट रेट: या नावानेही ओळखले जाते (tachycardia).
जीबीएस रोगाचे किती प्रकार आहेत?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा सिंड्रोमचा एक समूह आहे जो परिधीय मज्जासंस्थेवर अनेक प्रकारे परिणाम करतो. मुख्य प्रकारांमध्ये हे समाविष्ट आहे.
तीव्र दाहक डिमायलिनेटिंग पॉलीन्यूरोपॅथी (AIDP): अमेरिकेत आणि युरोपमध्ये हा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे प्रामुख्याने ((नसांचं संरक्षणात्मक आवरण) प्रभावित करते, ज्यामुळे हात आणि पायांमध्ये अशक्तपणा आणि संवेदना गडबड होते.
- मिलर फिशर सिंड्रोम (MFS): हा GBS चा एक दुर्मिळ प्रकार आहे ज्यामध्ये ट्रायड ऑफ ॲटॅक्सिया (समन्वय कमी होणे), ऑप्थाल्मोप्लेजिया (डोळ्याचे स्नायू कमकुवत होणे) आणि अरेफ्लेक्सिया (प्रतिक्षेपांची अनुपस्थिती) द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे.
- तीव्र मोटर एक्सोनल न्यूरोपॅथी (AMAN): खरंच. GBS उपप्रकार जो प्रामुख्याने अक्षांना नुकसान करतो. हा प्रकार प्रामुख्याने मोटर कार्यावर परिणाम करतो आणि आशियामध्ये प्रचलित आहे.
- तीव्र मोटर आणि सेन्सरी एक्सोनल न्यूरोपॅथी (AMSAN): तसेच, AMAN प्रमाणे, ते मोटर आणि संवेदी मज्जातंतू दोन्हीवर परिणाम करते, ज्यामुळे हालचाल आणि संवेदना कमी होतात. हे अधिक गंभीर आणि कमी उपचार करण्यायोग्य आहे.”
- बिकरस्टाफ ब्रेनस्टेम एन्सेफलायटीस (BBE): एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) सहभागासह जीबीएसचा एक दुर्मिळ प्रकार. यामुळे गिळणे, बोलणे आणि श्वास घेणे तसेच डोळे हलविण्यास असमर्थता यासह संभाव्य मोटर समस्या उद्भवू शकतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची कारणे काय आहेत ?
GBS चे नेमके कारण अद्याप अज्ञात आहे, परंतु बहुतेकदा ते संसर्गापूर्वी होते. जीबीएसला चालना देणाऱ्या सामान्य संक्रमणांमध्ये हे समाविष्ट आहे.
- श्वसन संक्रमण: जसे की फ्लू किंवा न्यूमोनिया.
- गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन: – विशेषत कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी, कमी शिजवलेल्या पोल्ट्रीमध्ये आढळणारा जीवाणू मुळे होतो.
- व्हायरल इन्फेक्शन्स: – जसे झिका विषाणू, एपस्टाईन-बॅर व्हायरस आणि सायटोमेगॅलव्हायरस.
- गेल्या काही दिवसामध्ये याचे अचानक प्रमाण वाढल्याचे जे दिसून आले त्यात एक कारण म्हणजे पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे याचा संसर्ग वाढला आहे यातही अश्या अनेक गोष्टी लक्षात आल्या की, रस्ता खोदताना खाली असलेल्या पाणी पिणाच्या ज्या पाइप लाइन आहेत त्याला जोडून ड्रेनेजचे सुद्धा पाइप आहेत आणि ते फुटून एकमेकांमध्ये हे पाणी मिसळले आहे म्हणजे शौच मधून जाणारे ते ड्रेनेज चे जे पानी आहे ते पिण्याच्या पाण्यात मिसळल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला. आणि जी बी एस या आजारामद्धे लक्षणीय प्रमाणात वाढ झाली.
- अजून एक शंका अशी की हायवेवर किवा ढाब्यावर जे पाणी मिळते किवा ज्या पाण्यातून अन्न बनवले जाते ते दूषित असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बाहेरचे किवा उघड्यावरच अन्न खाणाऱ्या व्यक्तींना लागण होण्याची दाट शक्यता आहे.
- उघड्यावरचे अन्न , कच्चे अन्न अथवा मांसाहारी पदार्थ.
आधुनिक शास्त्राची चिकित्सा :-
- वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडींचा शोध घेता येतो. तसेच त्यांच्यावरील औषधे देता येतात. प्लेक्स (प्लाझ्मा एक्स्चेंज) म्हणून एक उपचाराचा प्रकार आहे. हा डायलेसीससारखा प्रकार असतो. रक्त फिल्टर केलं जातं आणि रक्तातील शरीराला इजा करणाऱ्या अँटीबॉडीज रक्तातून काढून टाकल्या जातात. क्वचित आजारचे संक्रमण फुफुसा पर्यन्त गेल्यास ventilator ची गरज पडते.
- Immunoglobulin नावाच्या गटातील एक औषध जे या आजारामुळे आलेल्या मज्जा-तंतु वरचे आवरण जे खराब होत असते किवा ते निघून जाण्यामद्धे या औषधीचा उपयोग होतो.
- काही वेळेला स्टेरॉईडस चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.
आयुर्वेदानुसार या आजारकडे कसे पहावे ?
आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. ,पण गीयन बारे सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) एक गंभीर तीव्र अर्धांगवायूचा (न्यूरोपॅथी )असणारा आजार आहे ज्यामध्ये सामान्यतः संक्रमणानंतर जलद प्रगती होते. सक्रिय औषधे असूनही, ते गंभीर अशक्तपणा, अपूर्ण पुनर्प्राप्ती आणि वेदनांशी संबंधित आहे. दीर्घ रोगाच्या कोर्समुळे सामान्य आरोग्यामध्ये बिघाड होऊ शकतो आणि श्वासोच्छवासाच्या गतीमद्धे जीवघेण्या प्रमाणे त्रास होऊ शकतात.
आपल्याला माहिती आहेच की आयुर्वेद ही 5000 किवा त्यापेक्षाही जास्त वर्षापूर्वीचे शास्त्र आहे, कोणताही नवीन आजाराचे वर्णन हे आयुर्वेद शास्त्रात ऋषीमुनींनी आधीच लिहून ठेवलेले आढळते आणि म्हणूनच कोणताही नवीन आजार उद्भवला की, आयुर्वेदिक वैद्य रुग्णाच्या प्रकृती,विकृती आणि लक्षणे यानुसार त्याचे निदान आणि चिकित्सा करतात.
जी बी सिंड्रोमचा आयुर्वेदात तंतोतंत संबंध नाही, परंतु सादरीकरणांशी जुळवून घेताना त्याची व्याख्या “सर्वांग वात” (संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा वात), कफावृत व्यान आणि कफावृत प्राण असे करण्यात येते.
व्यान आणि प्राण हे वाताचे 2 प्रकार आहेत जे अडथळा आणतात.
येथे मुख्य विकृत दोष वात आहे, जो त्रिदोषांमधील प्रमुख दोष आहे.
“पित्तम पंगु कफम पंगु पंगवो मल धातव: | वायुना यत्र नियन्ते तत्र गच्छती मेघवत” ||
म्हणजे पित्त आणि कफ दोष ही वात या दोषा समोर अपंग आहेत इतके वात दोषाचे महत्व आहे. वात दोष हा पित्त आणि कफाला आणखी विकृत करतो. म्हणून वात दोष शांत करणे आवश्यक आहे.
सामन्यात: वात दोषाचे 80 प्रकार वर्णन केले आहेत आणि त्याचप्रकारे त्याची लक्षणे आणि संप्रति व चिकित्सा याचेही वर्णन आढळते.
कोणताही नवीन आजार पाहताना रुगाणाची प्रथमत: लक्षणे पाहणे जरुरीचे ठरते यामध्ये सामन्यत: ज्वर म्हणजे ताप हा अत्यधिक प्रमाणात आढळणारे लक्षण होय. मनुष्याला जन्मत: आणि मृत्यू च्या वेळी ताप म्हणजे ज्वर हेच लक्षण प्रामुख्याने आढळून येते.
म्हणून कोणत्याही नवीन व्याधीचे संक्रमण झाल्यानंतर वैद्य हे जीर्णज्वर याप्रमाणे चिकित्सा केल्यास 50% उपशम मिळताना दिसते.
इतर लक्षणे , पूर्वीचा व्याधी इतिहास, ऋतु, वय, काळ यानुसार इतर दोषाची चिकित्सा ठरते व कोणत्याही नवीन आजारात उपशय मिळण्यास मदत होते.
कारण आयुर्वेदानुसार फक्त रोग्याची आणि रोगाचीच चिकित्सा होते असे नसून निरोगी माणसाला देखील त्याचे स्वास्थ टिकवण्यास मदत मिळते.
म्हणूनच आयुर्वेदानुसार दिनचर्या ऋतुचऱ्या आणि आहार-विहाराच्या नियमांचे पालन करणे जरुरीचे ठरते.
वात दोषा ला कमी करण्यासाठी वाताचे सर्व उपक्रम करणे जरुरीचे ठरते. जसे की,
- कोष्टशोधन (आतडे साफ करणे) म्हणजेच पंचकर्मतील शरीरशुद्धी चिकित्सा
- पोटातून औषधांची योजना
- अभ्यंग (औषधयुक्त तेलाने संपूर्ण शरीराला मसाज)
- क्षीर परिषेक (औषधयुक्त दूधाची शरीरावर धार धरणे)
- षष्टीक शाली पिंड स्वेद (औषधीयुक्त तांदूळ आणि दूध यांचा शेक देणे)
- अन्न-लेप (औषधयुक्त अन्न लेपण करणे)
- शिरोबस्ती (ट्रान्स क्रॅनियल ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन)
- बस्ती (औषधांचे ट्रान्स रेक्टल administration)
- अग्निकर्म आणि विद्धकर्म
पंचकर्म उपचार 14 -21 दिवस आणि त्यानंतर पुढील 151 दिवस तोंडावाटे औषधोपचार घेतल्यास आराम होते.
आयुर्वेदातील काही उपयुक्त औषधे :-
- दशमूल कशाय
- बृहत वात चिंतामणी
- क्षीरबला तैल व कॅप्सुल
- गुडूची यष्टी बला कवाथ
- त्रयोदशांग गुगुळ
- बलारिष्ट
- महामाष तैल
- महावातविध्वंस रस
- समीरपन्नग रस.
आजार होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी :-
प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे 1) वयक्तिक पातळीवर आणि 2) सामाजिक पातळीवर
- उठण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा नियमित असाव्यात
- नेहमी पथ्याचे, घरी बनवलेले आणि वेळेत जेवण करावे
- अन्न नेहमी ताजे आणि स्वच्छ असावे
- पाणी कितीही फिल्टर केलेले असले तरी 20 मिनिटे उकळून घ्यावे
- नियमितपणे आसने आणि प्राणायाम करावेत. प्राणायाम केल्याने शरीरातील रक्ताची आणि ऑक्सिजन ची पातळी वाढण्यास मदत होते त्यामुळे त्याचा अवलंब नक्की करावा.
- बाहेरचे, बेकरीचे, आणि preservative अन्न खाऊ नये
- मांसाहार करू नये.
- कोणतेही व्यसन करू नये
- वैयक्तिक स्वच्छता ठेवावी
- सार्वजनिक स्वच्छता ही ठेवावी
- उघड्यावरील अन्न खाऊ नये
- भाज्या स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुऊन शिजवून खा.
- कच्च्या गोष्टी म्हणजे सॅलड खाऊ नये.
- शौचाला जाऊन आल्यावर हात स्वच्छ धुणे.
- बाहेरून आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवावे.
- उलट्या जुलाब हे सामान्य लक्षण असल्याने जर आपणास यानंतर हातापायमद्धे अशक्तपणा जाणवला, हाताची मूठ वळवणे किवा पायाची हालचाल करता येत नाही अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब वैद्यकीय सेवा घ्यावी.
कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतल्यास कोणताही आजार हा रोखता येऊ शकतो. आणि म्हणूनच जेव्हा अश्या प्रकारचे रोग निर्माण होतात तेव्हा आपण फक्त स्वतःचीच नाही तर सामाजिक पातळीवर ही निसर्गाची ही काळजी घेतली पाहिजे.
“ॐ सर्वे भवन्तू सुखिन: | सर्वे सन्तू निरामया: || ॐ शांती शांती शांती: ||”
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |