परीकथेतील राजकन्या उंच, सावळा व आकर्षक (Tall,Dark &Handsome) असा राजकुमार निवडते अशी गोष्ट नेहमीच आपण ऐकतो. हे जरी फक्त गोष्टिपुरते मर्यादित असले, तरीही आपला मुलगा / मुलगी उंचपुरा असावा असे सर्वच पालकांना वाटते. ऊंची जास्त असणार्या मुलांचा प्रभाव इतरांवर चांगला पडतो असे समजले जाते. आपल्या समाजात ऊंची जास्त असणे ही प्रभावी व्यक्तिमत्व असल्याची खुण समजली जाते.
कमी ऊंची असलेली मुले इतर मुलांपुढे पौगंडावस्थेत जाताना बुजर्या स्वभावाची व आत्मविश्वास कमी असलेली बनू शकतात. यामुळे न्युंनगंडाची भावना मुलांमध्ये दिसून येते.
आजच्या स्पर्धेच्या युगात ऊंची हा खूप महत्वाचा विषय आहे.
लष्करी दलापासून ते सौन्दर्य स्पर्धांपर्यंत उंचीचे फार महत्व आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव, सतत मोबाइल अथवा कम्प्युटर्स चा एका जागी बसून वापर, मैदानी खेळाचा अभाव या सगळ्या गोष्टीमुळे आजकाल लहान मुलांची ऊंची आणि वजन अगदी कमी प्रमाणात वाढत आहे. त्यातल्या त्यात सगळ्या पालकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे आपल्या पाल्याची ऊंची वाढत नाही.
दुर्दैवाने आज बाजारात ऊंची वाढविण्यासाठी झटपट व आकर्षक परिणाम साधण्यासाठी अनेक उत्पादने विकली जातात. परंतु कायमस्वरूपी परिणाम साधण्यासाठी मेहनतीला पर्याय कधीच नसतो.
ऊंची ही मुख्यता अनुवांशिकता आणि आपल्या पौष्टिक आहारानुसार निश्चित होते. जर आपणास पुरेसे पोषण मिळाले तर आपण कदाचित आपल्या अंनुवशिकदृष्ट्या पूर्वनिर्धारीत उंचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहचू शकतो.
साधारणता आपल्या वयाच्या 10-12 वर्षापर्यंत आपली ऊंची ही एका समान मात्रेत वाढत असते. नंतर मात्र हा ऊंची वाढण्याचा कालावधी वयात येईपर्यंत म्हणजे तारुण्य येईपर्यंत अगदी कमी होऊन थांबतो. मुलींचे वय 18 आणि मुलांचे वय 20 होईपर्यंत ऊंची वाढते. या ऊंची वाढीचा शेवट म्हणजे हाडाचे रूपांतर (bone epiphysis) म्हणजे लांबट हाडाचे वाढलेले परंतु कुर्चेच्या सहाय्याने अस्थिदंडाला जोडले गेलेले टोक या अवस्थेत होते.
तरुणावस्थेत आल्यानंतर हाडे घट्ट होऊ लागतात. यानंतर मात्र हाडांची ऊंची वाढणे अशक्य असते. अशा वेळी वाढीच्या संप्रेरकांचे अत्यधिक उत्पादन देखील प्रौढ (21 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या) लांबलचक हाडे वाढविण्यास मदत करू शकत नाहीत.
साधारणत: दिवसा आपली ऊंची पाठीच्या कोम्प्रेशन मुळे थोडी कमी असते. व्यायामामुळे उंचीवर साधारणत: ¼ ते ½ इंचाचा फरक दिसून येतो.
जपान सारख्या देशामध्ये त्या लोकांनी आपली ऊंची ही फक्त व्यायामाने वाढवली आहे.
भारतीय संस्कृती ही फक्त शरीर सौन्दर्यापेक्षा एकूण व्यक्तिमत्व विकास कसा होईल याकडे लक्ष पुरवायला शिकवते व सुदैवाने आपले आयुर्वेद शास्त्र त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.
इतर मुलांशी तुलना करून झटपट उपायांच्या मागे न लागता योग्य वयात आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने, वैज्ञानिक माहितीच्या आधारे योग्य उपचार व व्यायाम ह्यांचा आधार घेउन उत्तम परिणाम साधता येतात.
Table of Contents
आयुर्वेदात ऊंची वाढविण्यासाठी काही वर्णन आहे का?
आयुर्वेदामद्धे ऊंची चा संबंध हा वात दोषाशी आहे. वात दोषाचे शरीरातील महत्वाचे स्थान म्हणजे “पक्वाशय कटी सक्थि श्रोत्रास्थी स्पर्शंनेंद्रियम” |पक्वाशय, कंबर, मांड्या, कान, हाडे व त्वचा या ठिकाणी संगितले आहे.
उंडुक म्हणजे पुरीषधरा कला जिथे अन्नपासून विष्ठा तयार होते व जिथे पुरीषधरा कला आहे तिथेच अस्थिधरा कला आहे तिथेच हाडे तयार होत असतात. जठरामद्धे असलेला कफ हळूहळू ग्रहणी किवा लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात जातो आणि मोठ्या आतड्यात (पक्वाशय) असलेला वात दोष शमन किवा प्राकृत होऊन हाडे वाढण्यास मदत होते.
ऊंची न वाढण्याची कारणे कोणती?
- अनुवंशिकता – हे सर्वात पहिले व महत्वाचे कारण होय. घरामद्धे आई,वडील, काका, आत्या, आजी किवा आजोबा यापैकी कोणाचीही ऊंची कमी असेल तर या जनुकांचा परिणाम हा पुढच्या पिढीमधील मुलांच्या उंचीवर दिसून येतो.
- आहार – अपुर्या पोषणाने मुलांची वाढ होत नाही. त्यात आजच्या बदलत्या जीवनशैलीत फास्ट फूड, अंबवलेले, बेकरीचे, शिळे अन्न, फ्रीज मधील अन्नपदार्थ या सगळ्याचा परिणाम शरीरावर आणि मनावरही दिसून येतो.
- प्रकृती / दोष – पित्त वात अथवा वात पित्त अशी प्रकृती असलेल्या लोकांची ऊंची कमी आढळून येते. कफ प्रधान व्यक्तींची ऊंची ही चांगल्या प्रकारे वाढू शकते. कफ दोष हा शरीरातील धातूंचे आणि हाडांचे वर्धन करणारा दोष आहे.
- जुडो-कराटे-भरतनाट्यम-कुच्चिपुडी-टायक्वंदो अशा खेळांमुळे सेंटर ऑफ ग्रॅविटि बेंबिजवळ ठेवावी लागते व शरीर हे आकुंचित होऊ लागते.
- गर्भिणी अवस्थेत आईला होणारे आजार अथवा कुपोषण
- अपुरी झोप – पुरेशी झोप न घेतल्यानेही लहान मुलांमध्ये ऊंची वाढण्यावर परिणाम दिसून येतो.
- मासिक पाळी –मुलींमद्धे मासिक पाळी हे सर्वात मोठे कारण ऊंची कमी वाढण्याकरिता दिसून येते.
- आई वडिलांचे नात्यातील लग्न
- पचंनाच्या विकृती
- अंतस्त्रवि ग्रंथी विकृती
- रक्ताल्पता
- उष्णकटिबंधात जन्म
- जन्मजात विकृती
इ. सर्व कारणांनामुळे ऊंची वाढण्यात खूप अडथळा येतो.
ऊंची किती वर्षापर्यंत वाढते?
वयाच्या 18 वर्षा पर्यन्त मुला-मुलींमद्धे ऊंची वाढते. यानंतर ऊंची खूप कमी प्रमाणात वाढताना दिसते आणि याकरिता खूप प्रयत्न करावे लागतात.
आई वडिलांची ऊंची कमी असेल तर मुलांची ऊंची वाढते का?
अनुवंशिकता हा ऊंची न वाढण्याचे महत्वाचे कारण होय. आई, वडील, काका, आत्या किवा आजी आजोबा यापैकी कोणाचीही ऊंची कमी असेल तर ऊंची वाढण्याचे प्रमाण हे पुढच्या पिढी मध्ये कमी आढळते.
अनुवंशिकता असूनही आयुर्वेदामद्धे याकरिता बीज संस्कार किवा गर्भसंस्कार हे सांगून ठेवले आहेत. याच्या सहाय्याने आपण शरीरातील अंनुवंशीक दोषामद्धे बदल घडवू शकतो.
किती वयाच्या मुलाची किती ऊंची असावी ह्याचे काही निकष आहेत का?
वय वर्ष |
मुलाची ऊंची (फूट व इंच) |
मुलीची ऊंची (फूट व इंच) |
१-५ | २.४–३.५ | २.४ – ३.५ |
५-७ | ३.५ -३.९९ | ३.५ – ३.९ |
७-९ | ३.९९ -४.३ | ३.९ -४.३ |
९-११ | ४.३ -४.७ | ४.३ -४.७ |
१२ | ४.८९ | ४.९ |
१३ | ५.१२ | ५.१ |
१४ | ५.३७ | ५.२ |
१५ | ५.५ | ५.२३ |
१६ | ५.६८ | ५.३३ |
१७ | ५.७४ | ५.३४ |
१८ | ५.७६ | ५.५ |
मुलगा व मुलगी ह्या दोघांची ऊंची वेगळ्या वेगाने वाढते का?
मुलांमध्ये साधारण वयाच्या १८-२० वर्षापर्यंत ऊंची वाढते परंतु मुलींमद्धे मात्र हे प्रमाण अगदी कमी जाणवते.
मुलींमद्धे साधारण १६-१८ पर्यंतच ऊंची वाढलेली जाणवते यानंतर ऊंची वाढणे अतिशय कठीण असते.
मुलींमधे मासिक पाळी सुरू झाल्यानंतर शरीरामद्धे अनेक प्रकारे होर्मोन बदल दिसून येतात यानंतर शरीराची वाढ कमी होत जाउन मुलींमद्धे ऊंची मुलांपेक्षा कमी वाढताना दिसते.
मुलांची ऊंची व वजन ह्याचे प्रमाण किती महत्वाचे आहे?
पंचमहभूतांच्या या शरीरामध्ये सप्तधातू अनुसार योग्य प्रकारे घेतलेल्या आहार रसातून रक्ताची आणि उत्तरोत्तर अस्थिंची (हाडांची) निर्मिती होते.
आयुर्वेदानुसार शरीराचा आयाम आणि विस्तार समान असल्यास ती व्यक्ति अगदी योग्य प्रमाणात आहे हे ठरवले जाते.
प्राकृत मेदाची वृद्धी झाल्यानंतरच प्राकृत अस्तजींची उत्पत्ति होऊ शकते. अन्यथा काही लोक उंच असूनही कृश दिसतात व काही लोक उंची कमी असूनही खूप स्थूल किवा कृश दिसतात.
किती वयापासून, किती वयापर्यंत ऊंची वाढविण्यासाठी प्रयत्न करावा?
साधारण वय वर्षे 6 पासून ते 18 वर्षापर्यत्न ऊंची वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. कारण या कालामध्ये बालकांचे वर्धन होत असते. याचकरिता आपल्या जवळच्या वैद्यचा सल्ला घेउन बालकाचा आहार,त्याची प्रकृती,औषधे, पंचकर्म व कोणते व्यायाम करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणे महत्वाचे ठरते.
व्यायामाने ऊंची वाढते का आणि कोणते व्यायाम करावेत?
“शरीर आयास जननं कर्म व्यायाम सज्ञितम |
दिप्तग्नित्वम आंनलस्यम स्थिरत्वम लाघवम सृजा”||
व्यायामाने शरीरस लाघवता येते, उत्साह वाढतो,पचन सुधारते,अतिरिक्त मेद कमी होतो.
ऊंची वाढविण्याकरिता धावणे, पोहणे,खो-खो, बास्केट बॉल, फूटबॉल,लोंबकळणे,स्ट्रेचिंग, योगासने, प्राणायाम, दोरीवरच्या उड्या मारणे, सायकलिंग व सूर्य नमस्कारकरावे.
ऊंची वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
आपल्या पंचमहाभूती शरीरात पंचमहाभूतात्मक असा असणारा आहार आपण घ्यावा.
“षडरसाभ्यास: बलवर्णकराणाम श्रेष्टा” |
षडरसात्मक (म्हणजे गोड, तिखट, आंबट,खारट, तुरट, कडू) आपण घ्यायला हवा. जेवणाच्या सुरूवातीला गोड आणि शेवटी कडू रस घ्यावा. आपल्या शरीरात असणार्या पिट्यूटरी ग्रंथीचा ऊंची वाढविण्यात मोठा सहभाग आहे. ही पिट्यूटरी ग्रंथी शरीरामद्धे ग्रोथ होर्मोन (HGH) तयार करते जे ऊंची वाढण्यास करणीभूत ठरते. या होर्मोन ला प्रेरित करण्यासाठी बर्याच अन्नपदार्थांची मदत होऊ शकते.
लोह, कॅल्शियम, मेग्नेशियम,आयोडीन व फॉस्फरस हे हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. तसेच विटामीन बी 1,2, 6,7,ह्यांची ही गरज असते.
याकरितावाढीच्या टप्प्यात प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे.
- हिरव्या पालेभाज्या,फळे यासारख्या सहज पचण्यायोग्य प्रथिने किशोरांच्या आहारात समाविष्ट केल्या पाहिजेत.
- दूध व दुधाचे पदार्थ, तूपऊंची वाढीसाठी एक महत्वपूर्ण अन्न होय.
- मांसाहार कमीत कमी घ्यावा फक्त चिकन अथवा मटण सूप घ्यावे.
वजन व ऊंची याचा काही संबंधा आहे का?ऊंची वाढल्यास वजन ही वाढते का?
आपल्या शरीरामद्धे ७ धातू आहेत (रस,रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) आहार रसातून उत्पन्न रस धातू हा उत्तरोत्तर धातूंचे पोषण करीत असतो. जेव्हा प्राकृत मांस व मेद शरीरात तयार होते तेव्हाच बळकट आणि प्राकृत हाडे तयार होतात.
आणि याच प्रकारे ऊंची वाढताना वजनामध्येही वाढ होताना दिसते.
नैसर्गिक रित्या ऊंची वाढविता येते का?
योग्य षडरसात्मक आहार, व्यायाम,पोट साफ होणे,चांगली झोप,देशी गाईचे धारोष्ण दूध, तसेच उंच अशा वाढणाऱ्या वनस्पति ही, ऊंची वाढविण्यास मदत करतात जसे, नारळाचे दूध पोटात घेणे सकाळी व संध्याकाळी,अहळीव सारखे पदार्थ. अशा नैसर्गिक प्रकारे आपण ऊंची वाढवू शकतो.
ऊंची वाढविण्यासाठी कोणती योगासने व किती वेळ करावीत?
योगासनांमुळे शरीरास एक लवचिकपणा येतो आणि यामुळे नक्कीच ऊंची वाढलेली आढळून येते. याकरिता पुढील काही आसने नियमितपणे केल्यास फायदा दिसून येतो.
- ताडासन
- पश्चिमोतांनासन
- वृक्षासन
- सर्वांगासन
- शीर्षासन
- उष्ट्रासन
- त्रिकोणासन
- भुजंगासन
- सूर्य नमस्कार
साधारण काखेमद्धे आणि कपाळावर घाम आल्यावर व्यायाम करणे थांबवावे असा आयुर्वेदात उल्लेख आहे.
वय वर्ष 20 – 22 नंतर ऊंची वाढणे शक्य आहे का?
21 वयानंतरही ऊंची वाढते पण हे अपवादात्मक आहे.
क्वचित काही मुला-मुलींची ऊंची ही 18 – 20 वयानतरही वाढत असते, परंतु ती Lower 1/3rd of ankle joint आणि vertebral column मध्ये वाढत असते.
याकरिता जिद्दीने काम करायला हवे. कारण या वयात ऊंची वाढण्याचे प्रमाण खूप कमी असते.
आयुर्वेदामद्धे वय वर्षे 18 नंतर ऊंची वाढविण्यास आपण प्रयत्ंन करत असाल तर तिक्त क्षीर नावाचे बस्ती दिल्यास खूप सुंदर परिणाम ऊंची मध्ये दिसून येतो.
ऊंची वाढविण्यासाठी मैदानी खेळ निवडताना कोणत्या खेळांचा समावेश करावा?
खो-खो, धावणे,फूटबॉल दोरीवरच्या उड्या, मल्लखांब, लोंबकळणे,बॅडमिंटन, बास्केट बॉल असे मैदानी खेळ ऊंची वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात,परंतु आजकाल मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप आणि विडिओ गेम च्या काळात मुलांचे बाहेर खेळणे लोप पावत चालले आहे.
घरीच व्यायाम करून उत्तम परिणाम दिसतात, का व्यायाम शाळेत (gym)जाणे आवश्यक आहे?
नियमितपणे आपली दिनचर्या पालन करून आपण घरीसुद्धा आसनांचा सराव, प्राणायाम, दोरीवरच्या उड्या अगदी 45मिनिटे करणे उपयुक्त ठरते.
मानसिक तणाव व ऊंची ह्यांचा काही संबंध आहे का?
मानसिक ताणतणाव शरीरामद्धे काही संप्रेरके स्त्रवत असतात तसेच यामुळे शरीरामद्धे पित्त वाढायला लागते. शरीरात पित्त वाढण्यास सुरुवात झाली की, ऊंची वाढण्यास प्रतिबंध येतो.
मुलांची झोप अनियमित असल्यास उंचीवर त्याचा परिणाम होतो का?
शारीरिक व मानसिक स्वास्थ्यसाठी भावनिक समतोलासाठी आणि दिवसभराच्या उत्साहासाठी झोप अत्यंत आवश्यक असते.
सूर्य मावळताच आपल्या शरीरात मेलेटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवू लागते आणि झोप येऊ लागते. झोप नियमित आणि शांत असल्यास ताणतणाव कमी होतो, स्ट्रैस संप्रेरके कमी स्त्रवतात. झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात.ज्याचा उपयोग नादुरूस्त पेशींची, स्ंनायुंची दुरूस्ती व जोपासणा ह्यासाठी होतो
जेव्हा आपण झोपतो तेव्हा शरीरमध्ये HGH नावाचे संप्रेरक जे उंचीवधीसाठी उपयुक्त आहे ते स्त्रवते.मेंदूत सेरोटोनिन हे संप्रेरक योग्य प्रमाणात स्त्रवल्यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते. व उत्साह वाढतो.
हाडांची वाढ, रचना व पोषण ह्यांचा मुलांच्या उंचीशी संबंध असतो का?
षड्रसात्मक आहार, यामुळे मुलांचे वजन व ऊंची योग्य प्रमाणात वाढते. शरीरातील सप्त धातूंचे पोषण प्राकृत आहारावर अवलंबून असते, ज्यामुळे उत्तरोतर धातूंचे पोषण होऊन मुलांची वाढ योग्यरित्या होते. आहार रसातून उत्पन्न पहिला रस धातू हा रक्ताला बळ देऊन,शरीरातील मांसपेशींचे वर्धन करून पोषक हाडांची निर्मिती करते. शरीरातील वात दोष आणि अस्थिधातू हे आश्रयाश्रयि असल्या कारणाने शरीराची योग्य प्रकारे वाढ होते.
ऊंची व पाठीचा कणा यांचा संबंध असतो का?
पाठीचा कणा म्हणजे मेरूदंड हा मानवामध्ये उभा आढळतो तोच प्राण्यांमध्ये तो आडवा आहे. चालणे, बसणे, उठणे, धावणे, वाकणे या प्रत्येक क्रिया करताना आपल्या पाठीचा कणा हा महत्वाचा ठरतो.
जसजसे आपले वय वाढते तसतसा आपला पाठीचा कणा आकुंचीत होऊ लागतो. त्यामुळे ऊंची वाढत नाही.
योगामुळे पाठीच्या कण्याचे आणि पाठीचे स्नायू मजबूत व्हयायला लागतात.
ऊंची लवकर वाढण्यासाठी कोणती जीवनसत्वे (vitamins) आहारात जास्त असावीत?
लोह, कॅल्शियम, मेग्नेशियम, आयोडीन व फॉस्फरस हे हाडांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात. तसेच विटामीन बी 1, विटामीन डी,विटामीन सी, विटामीन बी2 (रायबोफ्लेविन), ह्यांची ही गरज असते.
याकरिता वाढीच्या टप्प्यात प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे.जसे की सर्व पालेभाज्या, फळे,फळभाज्या, डाळी, दूध व दुग्धजन्य पदार्थ.
आहार, फळे, दूध, जेवणातील पदार्थ, कडधान्ये, केळी यापैकी काय उपयुक्त ठरते?
पोषक आणि षड्रसात्मक आहार आपल्या शरीरातील सप्त धातूंचे पोषण करण्यास नेहमीच उपयुक्त ठरतो. आहारमध्ये दूध, फळे, कडधान्ये या सर्वांचा उपयोग सप्त धातुवृद्धी साठी महत्वाचा ठरतो.
मांसाहार केल्याने ऊंची लवकर वाढते, हे खरे आहे का?
आयुर्वेदानुसार मांसाहार हा तामसिक गुणात्मक सांगितला कारणाने याचा शारीरिक च नव्हे तर मानसिक पातळीवर देखील जास्त उपयोग होताना दिसून येत नाही.
त्यामुळे नेहमी सात्विक आहार म्हणजे भाज्या, दूध, फळे असा आहार घेण्यास संगितले जाते.
मांसाहार घेणे झाल्यास च ते अगदी योग्य प्रकारे शिजवणे महत्वाचे आणि दुसरे म्हणजे अगदी कमी प्रमाणात त्याला मसाला वगैरे वापरावा जेणेकरून शरीरातील पित्त आणि तामसी गुण वाढू नये.
चिकन व मटण घेत असल्यास शक्यतो त्याचे फक्त सूप घ्यावे.
चहा व कॉफी वर्ज्य करावी का?
चहा आणि कॉफी सारखी मादक द्रव्ये शरीरात केफेन नावाचे द्रव्य उत्सर्जित करते जे ग्रोथ होरमोन (HGH) वाढविण्यास प्रतिबंध करून शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण ही कमी करते. (काही निकषांद्वारे).
चहा आणि कॉफी सारखी द्रव्ये घेतल्यास शरीरमध्ये पित्ता दोषा ही वाढण्यास लागतो जो उंची वाढीकरिता उपयुक्त नाही.
Tv वरील जाहिरातींमध्ये दुधात मिसळून घेण्याची अनेक उत्पादने दाखवली जातात, त्यांचा खरच उपयोग होतो का?
टीव्ही वर पाहून कोणत्याही प्रकारचे औषध अथवा पाऊडर घेणे हानिकारक ठरू शकते कारण काही वेळा जलद परिणाम साधण्यासाठी काही संप्रेरके (होरमोन) किवा स्टेरोइड्स अशा औषधामद्धे मिसळली जातात ज्यांचा परिणाम शरीराच्या वाढीवर होऊ शकतो.
आयुर्वेदामद्धे अश्वगंधा, शतावरी यासारखी काही औषधे वर्णन केली आहेत जी दुधासोबत सेवन केल्यास ऊंची व वजन वाढण्यास उत्तम फरक दिसतो परंतु आपले जवळच्या वैद्यच्या सल्ल्यानुसार च ही औषधे आपण घ्यावीत म्हणजे उत्तम परिणाम दिसून येतात.
मुलगा व मुलगी दोघांनाही सारखेच उपचार असतात का?
मुलगा व मुलगी या दोघांमध्येही ऊंची आणि वजन वाढण्याचा दर हा वेगवेगळा असतो त्याच प्रमाणे या करिता औषधे ही वेगवेगळी व त्या त्या दोष आणि प्राकृतिनुसार ठरतात.
जे औषध मुलाला लागू पडेल तेच दुसर्या मुलाला अथवा मुलीला लागू पडेल असे नाही,दोष, प्रकृती, वय, बल, देश, काळ, नाडी परीक्षा यानुसार औषधे बदलतात.
ऊंची वाढण्यासाठी पंचकर्म उपचार आवश्यक आहेत का?
18 वर्षांनंतर मुलांच्या उंचीवाढीसाठी खूप प्रयत्न करावे लागतात आणि त्याकरिता पोटातील औषधे, व्यायाम व पंचकर्माची जोड दिल्यास उत्तमरीत्या परिणाम दिसून येतो.
पंचकर्मा मध्ये कडू रसाचे बस्ती, नाकात औषधीयुक्त तेल अथवा तूप,पोटामद्धे काही औषधी तूप घेणे व अंगाला सिद्ध अथवा तिळ तेल लावणे महत्वाचे ठरते.
मुलांची ऊंची वाढविण्यासाठी आयुर्वेद शास्त्रानुसार काही विशेष उपचार उपलब्ध आहेत का?
आयुर्वेदानुसार ऊंची वाढीसाठी सर्वप्रथम दोष आणि प्रकृती यांचा संबंध खूप महत्वाचा ठरतो. शरीरातील वात आणि कफ दोष हे ऊंची वाढविण्यासाठी पूरक ठरणारे दोष आहेत.
आईच्या पोटात गर्भाची जेवढी वाढ होते तेवढी कधीच होत नाही, त्यामुळे आहार रस/ रस धातू सदृश दूध ऊंची वाढविण्याचा प्रथम उपचार. पोकळी असल्यावरच वाढ होऊ शकते सबब संध्यातील अवकाश वाढविण्यासाठी व्यायामची जोड लागते. साक्षात हाडे वाढविण्यासाठी आयुर्वेदात कडू रसाचे बस्ती दिले जातात नाकामद्धे औषधीयुक्ता तूप अथवा तेलाचा वापर केला जातो.
च्यवनप्राश, महापिशचिक घृत , शतावरी कल्प, यासारखी औषधे खूप सुंदर रित्या काम करतात.
यासोबत प्रकृती, वय, लिंग, दोष यानुसार दिलेली औषधे आनुवंशिकता घालवणे व उंचीला अडथळा आणणाऱ्या घटकांना दुरुस्त करते.
आयुर्वेदानुसार ऊंची वाढविण्याकरिता शरीरातील उष्णता कमी करून कफसदृश धातूचे वर्धन महत्वाचे ठरते.
नवरात्रीपासून मकर संक्रांतीचा काळ हा निसर्गात: ऊंची वाढविण्यासाठी अनुकूल ठरतो. थंड वातावरण हे ऊंची वाढीसाठी पोषक होय आणि यादरम्यान थंडी पडण्यास सुरुवात झाल्यावर आपला जठराग्नि प्रदीप्त होतो, भूक वाढते, प्रकृत त्रिदोषाच्या सहाय्याने अस्थिधातूची वृद्धी होण्यास हा अनुकुल काळ असल्याने या काळात ऊंची वाढीसाठी औषध घेतल्यास फायदा दिसून येतो.
ही औषधे आणि व्यायाम साधारण 3-4 महीने करावा. यामुळे मुलांची फक्त उंचीच वाढते असे नाही तर, हाडांची बळकटी,बुद्धिमत्ता आणि मानसिक विकासही होताना दिसून येतो.
याकरिता आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.