एका सकाळी अचानक फोन आला डॉक्टर तुम्ही आहात का आशिष ला खूप खोकला आहे त्याला दाखवायचे होते, आम्ही खूप दिवस सितोपलादी दिले आणि बाकी डॉक्टरांची औषधे पण दिली पण काहीच फरक पडत नाहीये.
मी हो म्हणल्यानंतर ते गृहस्थ १२ वर्षाच्या आशिष ला घेउन आले. सतत खोकल्याने त्रस्त आशिष ची अवस्था अगदी दयनीय झाली होती त्याला नीट उभेही राहता येत न्हवते. एक शब्द बोलायला लागला तरी खोकल्याची ढास सुरू.एक सेकंद ही त्याचा खोकला थांबत न्हवता. अॅंटीबयोटिक्स पासून अगदी इनहेलर पर्यन्त सगळी औषधे करून झाली. एक्सरे पासून सीटी पर्यन्त च्या तपासण्या मध्ये काहीही आढळले नाही. डॉक्टरानी allergicasthmadiagnose करून इनहेलर चालू केले.त्यानेही म्हणावा तसा फरक न्हवता. काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली का ?असे विचारल्यावर आम्ही त्याला सितोपलादी देत होतो, कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्यांनी त्याला सितोपलादी चूर्ण चालू केले, बरेच दिवस दिल्यानंतर त्याचाही काही गुण नाही असे मला कळवले.
त्याची नाडी परीक्षण केल्यानंतर अगदी हृदययाच्या ठोक्याप्रमाणे उडणारा वात दोष अगदी स्पष्टपणे जाणवला, आहार विहारची विचारपूस केल्यावर बाहेरून खेळून आल्यावर लगेच थंड पाणी पिणे,क्रीम बिस्किटे,टोमॅटो सौस , आइस क्रीम, चिप्स, मॅगी अशा गोष्टी सतत खाण्यामध्ये असणे असे आढळून आले. पोट कधी 1 दिवसानी तर कधी 2 दिवसानी साफ होण्याची सवय, टॉयलेट मध्ये मोबाइल बघत तासंतास बसण्याची सवय यामुळे सतत पोटदुखीचा त्रास. पोटाची तपासणी करता दुखणे आणि पोटफुगीजाणवली.यावर शेवटचे पोट कधी साफ झाले असे विचारल्यावर गेले 4 दिवस तो टॉयलेट गेलाच नाही असे समजले.यावर,आपण त्याला एक बस्ती देऊ असे मी म्हणल्यावर सगळ्यांनी अगदी साशंकतेने माझ्याकडे पाहिले. पण आता शेवटचा पर्याय म्हणून ते मी सांगेन तसे करायला तयार होते.
एक कोमट 60 एमएल सिद्धतेल बस्ती त्याला दिला आणि पुढच्या 10 मी. नि तो टॉयलेट ला पळाला 10 मी नि बाहेर आल्यावर खडा स्वरुपात टॉयलेट झाल्याचे समजले आणि 2-3 सेकंद नंतर त्याची खोकल्याची ढास येऊ लागली. बस्ती 7 दिवस रिपीट केले पोटातून पथ्य आणि कोमट पाणी इतकेच चालू ठेवले 6 व्या दिवशी खोकला 80% थांबला होता आता अगदी अधे-मध्ये ढास लागत होती.
आणखी 3 बस्ती आईस शिकवून देऊन 10 बस्ती नंतर खोकला पुर्णपणे थांबला होता. हा आयुर्वेदाचा चमत्कार नसून त्याच्या शरीरामद्धे साठलेला वात दोष होता.
भारतीय संस्कृतीमध्ये व ऋषीमुनींपासून चालत आलेल्या आयुर्वेद उपचार पद्धती सगळ्यांनाच माहिती आहेत. कोणत्याही दुर्धर आजारामधे आपल्याला अगदी शेवटी आठवते की, आपण आयुर्वेद उपचार करून पाहायला हवेत. आयुर्वेदिक औषधांचे काहीही साइड इफेक्ट नाहीत असे माहिती असल्याने आज घरोघरी वैद्य आहेत जे एकमेकाला अगदी रास्त मनमोकळे पणाने हे चूर्ण घे याने फरक पडतो असा सल्ला देतात. यामध्ये काही गैर नाही, परंतु जे औषध आजोबांना लागू पडेल तेच नातवाला पडेल असे नाही.
“पुरूषम पुरूषम वीक्ष्य”| या न्यायानुसार प्रत्येक व्यक्ति ही वेगवेगळी आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ति या त्रिदोशानुसार वेगवेगळ्या आढळतात. वय, अवस्था, आजार, ऋतु, काळ व व्यक्तिपरत्वे त्रिदोष हे बदलत असतात. शरीरामद्धे या दोषांना समतोल ठेवल्यास आपण शरीराचे स्वास्थ्य टिकवू शकतो व हेच त्रिदोष जर बिघडले तर मात्र एक न अनेक आजारांना आपण निमंत्रण देतो.
यासाठी आयुर्वेदामद्धे दोन प्रकारच्या चिकित्सा प्रामुख्याने सांगितल्या आहेत.
- शमन चिकित्सा
- शोधन चिकित्सा
शमन चिकित्सेमद्धे दोषांना औषधी चिकित्सेद्वारे समतोल स्थितीत आणले जाते. या उपचारामद्धे दीपन (अग्नि वाढविणारी), पाचक (पचनास उपयुक्त), व्यायाम, शुद्ध हवा व सूर्यप्रकाश. यांचा समावेश होतो.
शोधन चिकित्सा म्हणजे शरीरशुद्धी चिकित्सा होय. आजकाल आपण सगळेच गाडी वापरतो ती अगदी आवाज न करता बंद न पडता व्यवस्थित चालावी म्हणून आपण तिला नेहमी ओइलिंग आणि सर्विसिंग करत असतो, आपले शरीर ही आपल्या आत्म्याचे वाहन च आहे आणि याचकरिता आयुर्वेदामद्धे त्या त्या ऋतुत शरीराची सर्विसिंग (शुद्धी) कशी करावी याबद्दल संगितले आहे.यालाच आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा म्हणाले जाते ज्यामधे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या चिकित्सा येतात.
यामधील बस्ती या चिकित्सेविषयी आज आपण पाहणार आहोत.
बस्ती ही आयुर्वेदातील “अर्ध चिकित्सा” मानली जाते. कोणत्याही अवस्थेत, काळात, वयात, आणि आजारात बस्ती चिकित्सा ही उपयुक्त ठरते.
बस्ती म्हणजे एनिमा असा व्यवहारातील फार भयंकर गैरसमज आहे.कृतीतील साधर्म्यमुळे हा गैरसमज झाला आहे. परंतु अंगाला औषधी सिद्ध तेले लावून पोटामध्ये विशिष्ट पद्धतीचे स्नेहपदार्थ घेउन आणि संपूर्ण अंगाला विशिष्ट शेक करून बस्ती करावयाचा असतो. हे करण्यापूर्वि शरीरातील अग्निमाद्य व अजीर्ण औषधी ने दूर करावे लागते.
शरीरातील वात दोष कफ व पित्त दोषांना काम करण्यास प्रवृत्त करत असतो. अशा वात दोषासाठी अशी औषधी सिद्ध तेले अंतर्बाह्य वापरणे गरजेचे असते. त्याबरोबर बस्ती उपचार ही निम्मी उपचार पद्धती आहे.
Table of Contents
बस्ती उपयुक्त आजार :
- पाठीचा मणका आणि इतर सर्व वातविकार
- कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, पाठदुखी
- हातापायला मुंग्या येणे
- हात पाय वळणेकिवा सुकणे,
- स्लिप डिस्क
- स्पौण्डिलोसिस, कौड कोम्प्रेशन, सायटिका
- फ्रोजेन शोल्डर, टेनिस एल्बो
- किडनी स्टोन, अथवा किडनी चे आजार
- स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी
- वंध्यत्व
- पक्षाघात
- पोटाच्या व पचना सबंधित तक्रारी
- मलावष्टंभ
- वजन वाढणे अथवा कमी होणे
- मूळव्याध
- त्वचेचे आजार
- मधुमेह इ. सर्व आजारात बस्ती उपचार पद्धती अतिशय सुंदर लागू पडते.
मुस्तादी यापन, दशमूळ-धन्वंतर, बला-गुडूच्याडी, पिपल्यादी असे निरनिराळे बस्ती शरीरातील अनेक व्याधीसाठी आयुर्वेदाने संगितले आहेत.
बस्ती उपचाराचा दूसरा फायदा म्हणजे कोणत्याही आजारात बस्ती उपचार केल्यामुळे हृद्य, मस्तीष्क आणि वृक्क या तीन मर्मांचे आरोग्य आपोआपच सुधारले जाते.या गोष्टीची गरज कमी जास्त प्रमाणात पस्तीशीच्या नंतरच्या प्रत्येक व्यक्तीस भासते. या बस्तीमुळे हार्ट अटॅक, मेंदूत रक्तस्त्राव, पक्षाघात, किडनी फेल्यर यासारख्या दुर्धर व्याधी भविष्यात उत्पन्न न होण्याची व्यवस्था आपोआपच होते.
कोणती पथ्ये पाळावी लागतात ?
बस्ती या उपचारामद्धे दुखणं खुपण, आत्यंतिक पथ्य पाणी आणि वेळेचा प्रचंड अपव्यय या गोष्टी फारशा घडत नाहीत. नियोजन मात्र आवश्यक असते.
फक्त व्याधिपुरताच बदल न होता बस्तीमुळे मनुष्यचा संपूर्ण कायाकल्प च पालटलं जातो. यामुळे वर्ण, बल, स्मृति, शरीरातील व मानसिक भावांमद्धे आमुलाग्र बदल दिसून येते.
कधी व केव्हा करावी बस्ती चिकित्सा ?
पायामध्ये जसा एखादा काटा असेल आणि तो काढल्याशिवाय उपचार करून घेण्यात काहीच फायदा होत नाही, त्याप्रमाणे त्या त्या ऋतुत शरीरामद्धे हवामान बदलामुळे वात, पित्त, कफ हे प्रमाणापेक्षा बाहेर वाढतात व आजार उत्पन्न करतात.
पावसाळयामध्ये हवामानाच्या बदलांनुसार शरीरात वात वाढून शरीर क्षीण होत व आजाराची प्रबलता वाढते. संसर्गचे प्रमाण वाढत आहे ते टाळण्यासाठी सर्वसामान्यांनी बस्ती घ्यावी.
पावसाळ्या मध्ये बस्ती ही अत्यंत उपयुक्त चिकित्सा ठरते.
वयाची काही मर्यादा असते का ?
बस्ती चिकित्सा 3 वर्षापासून ते 72 वर्षापर्यंतच्या सर्व रुग्णांना करता येते. कोणताही साइड इफेक्ट नसलेली ही बस्ती चिकित्सा निर्धोकपणे करत येते.
बस्ती घरी करता येऊ शकते का ?
नाही. बस्ती या उपचारामद्धे रुग्णांनुसार तेल काढे यांची मात्रा ठरवावी लागते व योग्य प्रकारे न केले गेल्यास याचे काही उपद्रव ही जाणवू शकतात म्हणून बस्ती ही आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखालीच करावी.
“बस्ती घ्यावा बस्ती द्यावा बस्ती जीवाचा विसावा” असे माझे गुरु नेहमी सांगतात. म्हणूनच शरीर स्वस्थ ठेवा व आपली प्रतिकार शक्ति वाढवा.
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |