साधारण मार्च २०२० महिन्यापासून जसा कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागला तसे सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. हजारो व्यवसाय व उद्योगांवर परिणाम होऊन संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था जणू कोलमडून गेली. परंतु सर्वात जास्त परिणाम झाला तो शालेय क्षेत्रावर. शाळा व महाविद्यालये ओस पडून लाखो विद्यार्थी घरातून online शिक्षण घेताना दिसून आले.

सहाजिकच तासनतास Mobile अथवा Laptop/Computer च्या पुढे बसून केवळ कार्यालयीन कामेच नाही तर शाळा व महाविद्यालयाचे वर्ग online भरू लागले. ह्या सर्वांचं वास्तविक परिणाम झाला तो दृष्टी व त्यामु;ळे उद्भवणाऱ्या आजारांवर. आज आपण डोळ्यांवर येणारा अतिरिक्त ताण व त्यापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे ह्याबद्दल वाचणार आहोत.

अनेक कार्यालयीन संस्था व उद्योग जगतातील मोठ्या संघटना work from home चा पर्याय कायमस्वरूपी कारण्याबद्दल विचार करीत आहेत. असे झाल्यास ह्या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

आयुर्वेदात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ह्याबद्दल अतिशय सुंदर माहिती उपलब्ध असून त्याचे पालन केल्यास भविष्यात उदभविणाऱ्या धोक्यांपासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण नक्कीच करता येईल ह्यात शंका नाही.

पंचज्ञानेंद्रियापैकी डोळा, एक अतिशय महत्वाचे इंद्रिय आहे. बघणे किवा दिसणे हे डोळ्याचे एक महत्वाचे कार्य. आयुर्वेदाच्या 8 अंगापैकी एक शाखा म्हणजे शालाक्य तंत्र यामध्ये डोळे, कान,नाक आणि डोके यासंबंधी वर्णन आले आहे. यालाच ऊर्ध्वजत्रूगत व्याधी (मानेच्या वरचे आजार) असेही म्हणले आहे.

एकूण 76 प्रकारचे नेत्ररोग आयुर्वेदात वर्णन केले गेले आहेत. प्रत्येक नेत्र व्याधी हा त्या त्या दोषाच्या प्रबल्याने वाढतो आणि कमी होतो.

यामध्ये वात, पित, कफ, रक्त, सर्वगत, बाह्यात आणि अभ्यतर असे वर्णन आढळते. डोळे हे पित्त आणि कफाचे आहेत.

या एव पित्ताधरा कला सा एव मज्जाधरा कला”.ग्रहणी स्थित पित्ताधारा कला ही डोळ्यामध्ये असेलेली मज्जा धरा कलाच आहे. डोळे ही कफाचे आणि पित्त दोषाचे.

चक्षु तेजोमय तस्य विशेषात श्लेषमातो भयम” | नेत्र तेजोमय असल्यामुळे त्यांना विशेषकरून कफापासून भीती आहे. याचाच अर्थ असा की, जर आपले पचन व्यवस्थित असेल तर आपल्याला डोळ्यांचेही आजार होऊ शकत नाहीत.

Table of Contents

डोळ्यांवर ताण कशामुळे येतो?

पंचज्ञानेंद्रियापैकी डोळा एक अतिशय महत्वाचे इंद्रिय आहे. बघणे किवा दिसणे हे डोळ्याचे एक महत्वाचे कार्य. हे कार्य अतिप्रमाणात किवा अयोग्य रित्या झाले तर डोळ्यांवर ताण पडतो.

दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा प्रभाव हा आपल्या डोळ्यांवर पडत असतो. या अतिरिक्त ताण-तणावामुळे डोळ्यांचे इतर आजार दिसून येतात.

त्यातील काही महत्वाची कारणे खालीलप्रमाणे :

  • सतत टीव्ही, मोबाइल अथवा कॉम्प्युटर पाहणे.
  • पोषक अन्नपदार्थाचा अभाव
  • अनिद्रा
  • धूर किवा धूळ यांचा डोळ्यांवर होणार परिणाम
  • उन्हामध्ये फिरणे
  • इतर व्याधींचा परिणाम जसे की, मधुमेह
  • बदलते वातावरण आणि जीवनशैली
  • उन्हातून आल्यावर एकदम थंड पाणी पिणे अथवा पाण्यात डुबणे.
  • फार वेळ लांब वर पाहणे
  • खूप उलट्या होणे
  • मल – मूत्र वेगाचा अवरोध
  • अतिशोक अथवा संताप करणे
  • अश्रूंचा अवरोध करणे
  • सूक्ष्म पदार्थ फार वेळ निरखून पाहणे
  • अति स्त्री-संग

डोळ्यांवर ताण आला आहे हे कसे ओळखावे?

  • डोळे लाल होणे
  • डोळे चोळणे
  • डोळे दुखणे
  • डोळे खाजणे
  • डोळ्यातून पाणी येणे
  • डोळ्यांची आग होणे /झोंबणे
  • जवळचे अथवा लांबचे अधू /दुहेरी दिसणे
  • डोकं दुखणे

कोणती लक्षणे दिसल्यास त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावे?

पुढील लक्षणे दिसल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा

  • डोळे दुखणे अथवा लाल होणे
  • दोन – दोन वस्तु अथवा प्रतिमा दिसणे
  • डोळ्यासमोर अंधारी येणे
  • सतत डोके दुखणे
  • सकाळी डोळे एकमेकाना चिकटणे
  • जवळची अथवा लांबची दृष्टी कमी होणे
  • सतत डोळ्यातून पाणी येणे
  • डोळ्यांची आग होणे
  • सतत डोळ्याना खाज येणे
  • तिरळे पणा
  • रात्रीचे कमी दिसणे अथवा न दिसणे

अतिरिक्त डोळ्यांवरील ताणाचे इतर कोणत्या गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते का?

डोळ्यांवर आलेल्या अतिरिक्त ताण-तणावामुळे डोळ्यांचे अनेक गंभीर आजार उद्भवू शकतात जसे की,

  • नेत्रपटलाचे आजार ( retinal disorder )
  • डोळ्यांच्या पडद्यावर रक्त साकळणे
  • डोळ्यातील बुबुळाचे विस्फरण योग्य रित्या न होणे
  • डोळ्याच्या मागील पडदा खराब होणे
  • डायबेटीक रेटिनोपॅथी ( diabetic retinopathy )
  • दृष्टिदोष म्हणजेच कमी दिसणे अथवा नंबर लागणे ( myopia )
  • बुबुळ वक्रता (astigmatism )
  • मोतीबिंदू ( cataract )
  • काचबिंदु ( glaucoma )
  • तिरळे पणा ( squint )
  • रातांधळेपण ( night blindness )
  • लासरू ( dacrocystitis )
  • मकुलर डीजनरेशन ( Maculardegeneration)

सतत Mobile/ Laptop/ Computer चा वापर केल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो?

सतत संगणक / मोबाइल यावर काम केल्याने स्नायूवर ताण पडतो व डोळे थकून जातात. ज्यावेळी आपण सतत मोबाइल अथवा लॅपटॉप चा वापर करत असतो त्यावेळी डोळे accommodate करीत असतात म्हणजेच आपले एकसारखे लक्ष आणि दृष्टी ही त्या स्क्रीन वर असते. याला (AccommodativeAsthenopia) म्हणतात. यामुळे नजर धूसर होणे आणि अंधुक दिसणे किवा डोके जड होणे अथवा दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.

प्रौढ व्यक्तीं पेक्षा लहान मुलांवर Mobile/ Laptop/ Computer च्या अतिरिक्त वापराचा परिणाम जास्त होतो का?

आज घराघरामद्धे लहान मुले पाहत असलेला मोबाइल स्क्रीन, कीवा टीव्ही, टॅब्लेट, आयपॅड चिंतेचा विषय ठरत आहे. याचा परिणाम लहान मुलांच्या फक्त डोळ्यावर हॉट नसून मानसिक आणि शारीरिक विकासावरही होत आहे.

स्क्रीन च्या प्रकाशामुळे / किरणामुळे केवळ डोळ्यावर नाही तर मानसिक विकासावर आणि झोपेवरही परिणाम दिसून येतात. परिणामे रात्रीची झोप कमी होते.

वाढत्या वायतील मुलांमध्ये लठ्ठपणा वाढणे मोठ्या प्रमाणावर आढळून येते. कारण मोबाइल , टीव्ही सोबतच जंक फूड खाण्याकडे सध्या खूप मोठा कल आहे. पोषक अन्न पदार्थाचा अभाव आणि किती खावे याकडे दुर्लक्ष.

स्क्रीन समोर बऱ्याच वेळ बसल्याने मुलांची बसण्याची पद्धत ही बदलते. पाठीला पोक काढून बसणे, सतत लोळत राहणे. यामुळे त्यांची शारीरिक वाढ खूप कमी प्रमाणात होताना दिसते.

वरील सर्व लक्षणे प्रौढ व्यक्तींमध्येहि दिसतात परंतु लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते.

कारण या सर्वांचा एकत्रित रित्या परिणाम हा मुलांच्या मानसिक विकासावरही होताना दिसतो.

मुलांमध्ये अतिशय चंचलता, चिडचिडेपणा अशी लक्षणे दिसून येतात.

लहान मुलांनी साधारण किती तास screen पुढे बसावे?

खरे तर लहान मुले आणि प्रौढ व्यक्ति नि दिवसातून फक्त 2 च तास स्क्रीन चा वापर करांवा. जेणेकरून याचे दुष्परिणाम आपल्यावर होणार नाहीत. डोळ्यांची, शरीराची आणि मनाची सुरक्षा याने करता येऊ शकते.

काळजी न घेतल्यास दृष्टी कायमची अधू होऊ शकते का?

हो, शक्यता खूप जास्त आहे. कारण सध्या आपण पाहतो की, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाइल च्या आहारी गेले आहेत सतत नजर आणि लक्ष मोबाइल कडे असल्याने डोक्यांचे आजार बळावत असून व्यवस्थित काळजी न घेतल्यास वाढलेल्या ताणामुळे डोळ्यांवर अत्यंत गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात.

डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी शून्य नंबरचा चष्मा अथवा गॉगल घालून बसावे का?

शून्य नंबर चष्मा किवा गॉगल आपल्या डोळ्याचे कॉम्प्युटर अथवा मोबाइल स्क्रीन पासून येणाऱ्या किरणांपासून बचाव करण्याचे काम करते.

अश्या प्रकारच्या चष्म्याची काच एक विशिष्ट निळ्या प्रकारच्या आवरणाने बनलेली असते. जे आपल्या डोळ्याना डिजिटल स्क्रीन पासून येणाऱ्या किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात.

कार्यालयीन काम screen पुढे बसून असल्याने रोज करण्यासाठी डोळ्यांवर काय उपाय करावेत?

एक सलग काम करत असल्यास मध्ये काही मिनिटांची विश्रांती घ्यावी. डोळ्याचे, मानेचे, हात-पायाचे काही सूक्ष्म व्यायाम करावेत.

काम संपल्यावर रोज रात्री जेवणामध्ये एक कच्चे गाजर नक्की खावे. याने डोळ्यांची क्षमता वाढून दृष्टी वाढते. रात्री झोपताना डोळ्यावर थंड दुधाची पट्टी ठेवावी अथवा काकडी चे काप ठेवावेत.

शक्य झाल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक तज्ञांकडून डोळ्यात घालण्यासाठी ड्रॉपस घ्यावेत व त्याचा वापर करावा जसे की, नेत्रसुदर्शन, फाइन आय ड्रॉपस, चंद्रकला वर्ति इत्यादि.

दिवासतून एक वेळा डोळ्यांचे व्यायाम नक्की करावेत. योग्य आहार सेवन करावा.

सलग अनेक तास screen पुढे बसणे अपरिहार्य असल्यास मधे मधे काही मिनिटांची विश्रांती घ्यावी का?

नक्कीच, जर आपणास सलग 2-3 तास स्क्रीन पुढे बसावे लागत असेल तर मध्ये काही मिनिटांची विश्रांती घेणे जरुरीचे आहे. जेणेकरून स्क्रीन चा अतिरिक्त ताण डोळ्यांवर येणार नाही आणि यामुळे इतर काही आजार जसे डोकेदुखी किवा पाठदुखी उद्भवणार नाही.

जमल्यास काही वेळाने थोडे चालावे हात आणि पायाचे काही सूक्ष्म व्यायाम करणे, डोळे हलक्या हाताने काही वेळ बंद ठेवणे, मानेच्या हालचाली तसेच डोळ्यांची काही हालचाली करणे,डोके आणि डोळ्याच्या बाजूला हलक्या हाताने मसाज कारणे. याने डोळ्यावर आलेला सततचा ताण कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

काही डोळ्यांचे व्यायाम सांगावेत?

रोज शीर्षासन /सर्वांगासन केल्याने काही फरक पडेल का?

हो नक्कीच. आयुर्वेद आणि योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. योग म्हणजेच शरीर, मन आणि आत्मा यांचा समन्वय होय.

शीर्षासनाला आसनाचा राजा असे म्हणाले जाते.

शरीराच्या इतर भागांपेक्षा डोळ्याला रक्त-पुरवठा हा कमी असतो. शिर्षासनाने संपूर्ण रक्त-पुरवठा हा डोळे आणि डोक्याकडे प्रवाहित होतो.

सर्वांगासन आणि हलासनामूळे रक्त प्रवाह डोळे आणि डोक्याकडे प्रवाहित होऊन मेंदू आणि डोळ्याजवळिल रक्तवाहिन्यांचे कार्य वाढवितो. यामुळे डोळ्याना आराम ही मिळतो.

रोजच्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश करावा?

शरीराच्या इतर भागांपेक्षा डोळ्याला रक्त-पुरवठा हा कमी असतो. खर तर डोळ्यांच्या काही भागांना रक्त पूरवठाच नसतो, उदाहरणार्थ कॉर्निया व लेन्स. डोळ्यांच्या पुढच्या भागात एक पारदर्शक द्रव्य (Aqueous) असते. ह्या द्रव्याचे निर्माण सतत सिलियरी बॉडी (ciliary body ) मधून होत असते. या द्रव्यामुळे डोळे फिरावल्यास डोळ्यांच्या आतल्या भागांना पोषण व ऑक्सीजन मिळते.

पौष्टिक आहार (शाकाहार / मांसाहार) जसे की भरपूर फळे, पालेभाज्या आणि फळभज्या या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात.

अ जीवनसत्व (Retinol):

डोळ्यांच्या नजरेसाठी महत्वाची भूमिका आहे. अ जीवन सत्व च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. हे डोळ्याच्या बाह्य त्वचेसाठी उपयुक्त आहे. यामुळे डोळे कोरडे पडतात, कॉर्निया पांढरा पडतो आणि अंधत्व येते.

डोळ्याच्या मागे असलेल्या संवेदनशील पडद्यावर (रेटिना) प्रकाशाचे किरण पडल्यावर अ जीवन सत्व एक रासायनिक प्रक्रिया करून परिवर्तन करते म्हणून ते डोळ्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरते.

  • अ जीवन सत्व असलेले पदार्थ: गाजर, आंबा, रताळे, शेवग्याच्या शेंगा, पालक व सर्व हिरव्या पालेभाज्या.
    प्रमाण : पुरुषांमध्ये –900 mcg / दिवस
    स्त्री –700 mcg / दिवस

जीवन सत्व सी (ascorbic acid ):

ही कोलेजन (collagen) निर्मितीसाठी अत्यंत महत्वाचे आहे, एक असे प्रोटीन जे डोळ्यांची रचना करते. यामुळे डोळ्यातील जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यास तोही लवकर थांबविण्यास ही मदत करते.

विटामीन सी antioxidantम्हणून काम करते. मोतीबिंदू (Cataract) आणि macular degenerationयामध्ये सी जीवन सत्व मुळे आजार कमी प्रमाणात वाढतो.

  • प्रमाण : 65- 90 mg / दिवस
  • जीवन सत्व सी असणारे घटक: लिंबू, संत्रे, आवळा, स्ट्रॉबेरी, किवी, मोड आलेली कडधान्ये.

जीवनसत्व बी (Riboflavin):

डोळ्यांच्या पापण्यांच्या हालचालीसाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होतो. बी जीवनसत्व मुळे डोळ्यांवर येणारा अतिरिक्त ताण कमी होतो. यामुळे डोळ्यांचे आजार होण्यास अडथळा निर्माण होतो.

  • जीवन सत्व बी असणारी घटकद्रव्ये: दूध, अंडी, मांसाहारी पदार्थ जसे चिकन, मटन, पालेभाज्या, चीज.
  • प्रमाण : 2.4 microgram / दिवस

जीवन सत्व ई (tocopherol) :

हे एक अत्यंत शक्तिशाली antioxidantआहे. मोतीबिंदू आणि यासारख्या वाढत्या वयामद्धे होणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारींवर जसे की [(AMD) age related macular degeneration] ही अत्यंत प्रभावशाली काम करते.

जीवन सत्व ई असणारे घटक द्रव्ये:- सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, मका तेल, बदाम, शेंगदाणे, सूर्यफूल बीया, पालक, अक्रोड ई.

  • प्रमाण : पुरुष व स्त्रिया : 15 mg / दिवस
  • गर्भिणी : 19 mg / दिवस

या व्यतिरिक्त लुटीन (lutein), zeaxanthin, omega-3 fatty acid, thiamine यांची गरज असते.

आयुर्वेदात डोळ्यांसाठी काही औषधे आहेत का?

नक्कीच, डोळ्यांसाठी काही प्रमाणित आणि प्रभावित औषधे आयुर्वेदात सांगितली आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे परंतु वैद्यच्या सल्ल्याशीवाय ही औषधे घेऊ नयेत.

  • सप्तमृत लोह
  • प्रवाळ पंचामृत
  • त्रिफळा चूर्ण / घृत / वटी
  • चंद्रकला वर्ति / वटी
  • महात्रिफला घृत
  • सूक्ष्म त्रिफला
  • आमलकी बीज मज्जा

आयुर्वेदानुसार डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी कोणती पंचकर्म चिकित्सा प्रभावी ठरू शकते?

आयुर्वेद ही एक प्रभावी शास्त्र असून याची चिकित्सा ही दोन भागात सांगितली आहे. शमन म्हणजे अभ्यतर चिकित्सा आणि शोधन म्हणजे पंचकर्म चिकित्सा होय. कोणतेही दोष शरीरातून मूळापासून घालविण्यासाठी पंचकर्म चिकित्सा अत्यंत उपयुक्त पद्धती आहे.

पंचकर्मतील विरेचन, बस्ती, आणि तर्पण या चिकित्सा डोळ्यांच्या प्रतेक आजारा करीता आणि डोळ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास उपयुक्त ठरतात.

  • तर्पण

    : तर्पण म्हणजे डोळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचे औषधीयुक्त तूप घालणे.यामुळे डोळ्यामध्ये वाढलेला वात, रुक्षपणा कमी करण्यास मदत करते, तसेच तर्पणामुळे डोळ्यांचा वाढलेला नंबर कमी होण्यास मदत होते.

नेत्रतर्पण ह्या पंचकर्म चिकित्सेचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पुढील video पाहावा

 

  • विरेचन

    : ही शरीरात साठलेल्या आणि दुष्ट प्रकारे तयार होणाऱ्या पित्ताला शरीराच्या बाहेर काढण्याचे काम करते. विरेचन म्हणजे औषधी युक्त जुलाबाची प्रक्रिया. यामध्ये काही विशिष्ट प्रकारची औषधी सिद्ध तूप पोटात देऊन रुग्णाच्या व्याधी आणि दोषानुसार विरेचनाचे औषध देऊन दोष जुलाब द्वारे शरीराबाहेर टाकले जातात. आपण वर पाहिल्याप्रमाने डोळे ही पित्ताचे असतात आणि दुष्ट पित्त डोळ्यांचे अनेक व्याधी उत्पन्न करतात याकरिता विरेचन हे अत्यंत उपयोगी ठरते.

  • बस्ती

    : बस्ती ही आयुर्वेदाची अर्धी चिकित्सा पद्धती होय. औषधीयुक्त दिलेला बस्ती हा पक्वशयातील दोष बाहेर काढून टाकण्यास मदत करतो. पक्वशय / ग्रहणी यातून नेत्राची उत्पती होते आणि म्हणूनच आयुर्वेदातील बस्ती नेत्रा रोगांसाठी अत्यंत उपयुक्त चिकित्सा आहे.

आयुर्वेदाची किमया अशी आहे की, पोटात दिलेल्या औषधाने डोळ्याचे आजार बरे होतात तर, डोळ्यात घातलेल्या औषधने पोटाचे आणि मुळव्याधीचे दोषाही घालवता येतात.

Business photo created by yanalya – www.freepik.com

Business photo created by gpointstudio – www.freepik.com

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

डोळ्यांवरील ताण – कारणे, लक्षणे व आयुर्वेदीय उपाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *