Table of Contents
डोकेदुखी व आयुर्वेद
अरे थोड शांत राहाल आज माझ खूप डोक दुखतय…. असे म्हणत बाबांनी ऑफिस मधुन आल्या आल्या घरात सगळ्यांना डावरल.
प्रत्येकाने अनुभवलेली असते ही डोकेदुखी. बहुतेकांना कधीतरी तर काहींना नेहमीची त्रासदायक अशी वाटणारी असते.
“ऊर्ध्वमूलम अध:शाखमृषय: पुरुष विदू:|
मूलप्रहारीनस्तस्माद्रोगान शीघ्रतर जयेत” ||
मुळे वर व फांद्या खाली असा पुरुष हा एक वृक्ष आहे, असे ऋषि म्हणतात म्हणून मुळांचा नाश करणारे जे शिरोरोग त्यास फार लवकर दूर करावे.
डोकेदुखी हा आजार नसून हे आजारामागील एक लक्षण आहे. त्यामुळे त्यावर तात्पुरती गोळी घेऊन शांत बसण्याएवजी त्याच्या मागची कारणे शोधणे हे फार महत्वाचे आहे. तात्पुरता उपाय करण्यापेक्षा कारण शोधून काढल्यास त्यामागील गंभीर आजार आपण टाळू शकतो.
आयुर्वेदानुसार हृदय, मेंदू आणि वृक्क हे आपल्या शरीराचे तीन महत्वाचे अवयव आहेत. म्हणून डोकेदुखी वर फक्त विचार न करता आपण इतर दोन अवयवांचा ही विचार केला पाहिजे याला आयुर्वेदात त्रिमर्म असे म्हणतात
आयुर्वेदानुसार डोकेदुखीचे प्रकार :
दोषानुसार | इतर अवस्थेनुसार |
वातज- वातामुळे उत्पन्न | अर्धावभेदक – (migraine) अर्धी बाजू दुखणे |
पित्तज – पित्त वाढल्याने | सूर्यावर्त– जसा सूर्य वर चढेल तसे डोके दुखणे |
कफज – कफ दोष वाढल्याने | अनंतवात–trigeminal neuralgia |
कृमिज -कृमी मुळे उत्पन्न | शंखक– शंख प्रदेशी डोके दुखणे. |
त्रिदोषज – तीनही दोषतून उत्पन्न |
नक्की कशामुळे होते डोकेदुखी :
- मळ व मूत्राचा अवरोध करणे
- अतिशय थंड पाणी पिणे
- उभे राहून पाणी पिणे किवा जेवण करणे
- उपाशीपोटी (जेवण न केल्यामुळे)
- अपुरी झोप
- दुपारी झोपणे
- सर्दी
- ताप
- मानदुखी
- मानसिक ताणतणाव
- सायनस अथवा कोणत्याही प्रकारची एलर्जी
- अपथ्यकर व शिळे पदार्थ खाणे, गोड पदार्थ खूप प्रमाणात खाणे
- जेवण करून व्यायाम करणे
- जेवण करून आंघोळ करणे
- डोळ्यांचे आजार
- पित्ताचे आजार
- सतत मलावष्टम्भ असणे
- अति रक्तदाब
- उन्माद अथवा अपस्मार
- मधुमेह
- दात अथवा दाढ दुखी
- सतत मोबाइल अथवा कम्प्युटर चा ताण
आयुर्वेदामद्धे डोके कुठे दुखते यानुसार त्याची चिकित्सा व लक्षणे वर्णन केली आहेत.
- कपाळाच्या ठिकाणी डोके दुखणे – रस धातू दुष्टि किवा कफामुळे डोके दुखणे (sinusitis)
- कपाळाच्या दोन्ही बाजूला दुखणे – इथे शंख नावाचे मर्म असते (thinnest temporal bone) जे शरीरातील मांस धातू खराब असल्याने दुखते.
- डोक्याच्या मागच्या बाजूला दुखणे – मज्जा धातू दुष्टि म्हणजे ताणतणावामुळे दुखते
- वरच्या मस्तकाच्या ठिकाणी दुखणे म्हणजे – रक्त आणि पित्त यामुळे दुखते
व याप्रत्येकाची चिकित्सा आयुर्वेदात चरक आचार्यांनी सांगितली आहे.
काही गंभीर कारणे :
- अर्धशिशी
- मेंदूत गाठ होणे
- मेंदूला सूज येणे
- रक्तस्त्राव होणे
- विषारी अन्न किवा औषधाचा परिणाम
- व्यसनाचा परिणाम
- काही विशिष्ट औषधांचा परिणाम
- रक्त वाहिन्या आकुंचन पावणे.
- मेंदुमद्धे जंतुसंसर्ग होणे.
वरील सर्व कारणाकडे लक्षं देणे गरजेचे आहे कारण यातून उद्भवलेली डोकेदुखी इतर मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकते.
वारंवार होणारी आणि गंभीर डोकेदुखी कडे दुर्लक्ष करू नका. गंभीर डोकेदुखीची लक्षणे खालीलप्रमाणे दिसू शकतात. अशा वेळी आपल्या जवळच्या वैद्यांचा सल्ला नक्की घ्या.
- एकच डोळा बारीक होणे
- एकच पदार्थ दोन-दोन दिसणे (double imaging )
- कानामध्ये तीव्र वेदना असणे
- बेशुद्धा अवस्था येणे
- डोके दुखत असताना भोवळ येणे
- प्रकाश सहन न होणे
- स्मरणशक्ती कमी होणे (Memory loss )
- अपस्माराचे झटके येणे
- डोके दुखत असताना हातापायच्या विकृत हालचाली होणे
काय व कशी काळजी घ्यावी ?
- सर्वात पहिले डोकेदुखी कशामुळे आहे याचे कारण शोधून काढणे
- कोणत्याही प्रकारचे आंबट, तिखट, शिळे,आबवलेले पदार्थ खाऊ नये.
- दही, पोहे, शेंगडणे बंद
- नाकामद्धे औषध सिद्ध तुपे अथवा तेलाचा वापर करावा.
- डोक्यावरुन अगदी गरम किवा अगदी थंड पाण्याने आंघोळ करू नये
- रात्रीचे जागरण टाळावे व दिवसा झोपू नये
- आठवड्यातून एक ते दोन वेळा खोबरेल तेल अथवा सिद्धा तेल डोक्याला लावावे.
- नेहमी पोट साफ ठेवावे
- संपूर्ण अंगाला तेल लावणे
- ताणतणावापासून दूर राहणे
उपयुक्त योगासने व प्राणायाम :
- शीर्षासन
- सर्वांगासन
- विपरीत करणी
- मानेचे सूक्ष्म व्यायाम
- अधोमुख श्वानासना
- उत्तानासना
- नाडी-शोधना प्राणायाम
- ओम जप
आयुर्वेदातील उपयुक्त वनस्पति :
- पुनर्नवा
- कढीपत्ता
- त्रिफळा
- एरंडमुळ
- माका
- विदारी
- यष्टीमधु
- जटामांसी
- वचा
- विश्व आणि भरपूर इतर आजारानुसार आणि व्यक्तिपरत्वे
आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा :
- आयुर्वेदातील बस्ती ही सर्व आजारांची निम्मी चिकित्सा आहे.
- शिरोधारा
- शिरोबस्ती अथवा शिरोपिचू
- नस्य चिकित्सा
महत्वाची सूचना : वर नमूद केलेल्या वनस्पति अथवा चिकित्सा या आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्यानेच घ्याव्यात कारण व्यक्तिपरत्वे आणि आजारानुरूप चिकित्सा ही बदलत असते .
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |
Want to know more of ayurvedic ,having Headache .