च्यवनप्राश एक भारतीय टॉनिक…उत्तमोत्तम रसायन !

डॉक्टर वेळ आहे का? असे म्हणत एक जुनी रुग्ण आपल्या ७ वर्षाच्या मुलाला घेऊन ओपिडी मध्ये आली

अरे तुम्ही या न या असे म्हणत मीही तिला आत बोलावलं.

नवर्‍याची बदली झाल्यामुळे ती गेली काही वर्षे मुंबईत असल्याचे समजले, मी म्हणाले काय म्हणताय काय विशेष ?

आम्ही जॅम घ्यायला आलोय…. असे लगेच आदित्य उत्तरला आदित्य म्हणजे तिचा ७ वर्षाचा मुलगा.

माझ्या चेहर्‍यावरच्या प्रश्नाची मुद्रा पाहूनच ती उत्तरली अहो डॉक्टर तो च्यवनप्राश ला जॅम म्हणतो.

हसू आवरतांच मला त्याचे फार कौतुक वाटले.

आदित्य २ वर्षाचा असल्यापासून ती त्याला माझ्याकडे सुवर्णप्राशन ला घेऊन येत असे. सुवर्णप्राशन म्हणजे आयुर्वेदिक औषधांनी बनविलेले तूप + मध + शुद्ध सुवर्ण भस्म यांच कॉम्बिनेशन.

Suvarnaprashan-Immunity for children

काही महिन्यांनंतर आम्हाला लक्षात आले की त्याचे वजन खूप कमी वाढते , भूक न लागणे, वातावरणात जरा बदल झाला की सर्दी, खोकला, इतर मुलांपेक्षा उंचीहि जरा कमी अशामुळे आम्ही त्याला च्यवनप्राश सुवर्णप्राशन सह रोज सकाळी एक चमचा असे चालू केले.

अगदी काहीच महिन्यांनातर खूप अमुलाग्र बदल आम्हाला दिसला व मी तिला च्यवनप्राश नेहमी चालू ठेवा असा सल्ला दिला.

नंतर बरेच वर्ष तीची भेट न झाल्यामुळे जॅम घ्यायला आलोय असे बोलणार्‍या आदित्यचे मला फार कौतुक वाटले.

चला पाहुयात काय आहे हा जॅम नक्की,

च्यवनप्राश हा अत्यंत प्राचीन काळापासून बनविला जाणारा अवलेह आहे जो आज रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे काम करतो.

अवलेह स्वरुपात असणारा हा च्यवनप्राश, म्हणून माझी रुग्ण आदित्य ला जॅम असे सांगून खायला द्यायची

ऐतिहासिक माहिती :

“भार्गवश्च्यवन कामी वृद्ध सन विकृती गत: |

वीर्य वर्ण स्वरोयेत कृतोसश्रिभ्या पुनर्युवा”|| (भावप्रकाश १,३)

प्राचीन काळी आयुर्वेदातील प्रसिद्ध व प्राचीन वैद्य अश्विनी कुमार यांची मोठी ख्याति होती ज्यांनी अनेक देवता तसेच ऋषि मुनींना आयुर्वेद चिकित्सेने  उपचार केल्याचे वर्णन आढळते.

प्राचीन काळातील च्यवन ऋषि वृद्धावस्तेत असताना त्यांनी युवा प्राप्तीसाठी अश्विनी कुमाराना प्रार्थना केली,यावर अश्विनी कुमारानी एक दिव्य औषधी तयार केली, ज्याच्या वापराने च्यवन ऋषिना पुन्हा युवा-वस्था प्राप्त झाली. ह्या  दिव्य औषधीचे नाव च्यवन ऋषीमुळे “च्यवनप्राश” असे ठेवण्यात आले.

या दिव्य च्यवनप्राशसाठी अश्विनी कुमारानी अष्टवर्गातील 8 औषधे शोधली व च्यवन ऋषींच्या कृश आणि वृद्ध शरीराला पुन्हा युवा वस्थेत आणले.

घटक द्रव्ये :

च्यवनप्राश मध्ये मुख्यता पाच प्रकारची तत्वे आढळतात.

  • प्रधान द्रव्य – आवळा
  • संसाधन द्रव्य – यामध्ये सर्व द्रव्ये पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये आवळे शिजवले जातात
  • यमक द्रव्य – यामध्ये तूप आणि तेलाचा समावेश होतो
  • संवाहक द्रव्य – यामध्ये साखर हे द्रव्य च्यवनप्राशला टिकवून ठेवण्यासाठी उपयोगात येते
  • प्रक्षेप द्रव्य – केशर, नागकेशर, छोटी वेलची, पिंपळी, दालचीनी, वंशलोचन, मध, तमालपत्र

यामध्ये जवळपास ४0 पेक्षा जास्त औषधाचा वापर केला जातो.

आवळा,वासा

अश्वगंधा, शतावरी

वेलची, दालचीनी

पुनरनवा, हळद, त्रिफळा

निम,केशर, गुळवेल

यष्टीमधू,गोक्षुर,बिल्व

तूप,अष्टवर्ग

दशमूळ,पिंपळी आणि इतर

आवळा हा महत्वाचा घटक च्यवनप्राश मध्ये आहे. च्यवनप्राश त्रिदोषनाशक आहे यामध्ये लवण (खारट) रस सोडून बाकीचे पाचही रस आहेत.

आवळा शुक्रधतुला पोषक, रसायन गुणांनी परिपूर्ण, पित्तदोषाचे शमन करणारा आहे

ताप, उलटी, दाह, प्रमेह, सूज, रक्तपितता, श्रम, मलावष्टंभ, पोटफुगी यावर उपयुक्त आहे. 

काही शास्त्रज्ञानुसार अवळ्यामद्धे एंटी ओक्सिडेंट एन्जाइम असल्याने ते तारुण्यपण टिकवण्यास मदत करतात असे प्रयोगा अंती सिद्ध झाले आहे.

उपयोग :

  • रोगप्रतिकार शक्ति वाढविते – यातील मुख्य घटक म्हणजे आवळा. आवळ्यामद्धे असलेल्या भरपूर विटामीन c मुळे कोणत्याही प्रकारच्या वायरस किवा बॅक्टीरिया पासून बचाव होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील पेशींचे कार्य सुधारते. 
  • हृदयाचे कार्य सुधारते – जंक फूड आणि खाण्यावर कोणताही नियम नसल्याने आजकाल शरीरामध्ये कोलेस्टेरोल चे प्रमाण वाढत आहे, परिणाम हृदयावर ताण आल्याने हृदयविकार उद्भवतात. च्यवनप्राश घेतल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण वाढते तसेच हृदयाच्या मांसपेशी बळकट होण्यास मदत होते.
  • पचनशक्ती सुधारते – नागकेशर, तमालपत्र, दालचीनी, वेलची यासारखी द्रव्ये पचनास मदत करतात व मळही नियमितरीत्या शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. घशात, छातीत जळजळ, पोटातील गसेस, व गेस्त्रोइंटेस्टीनल इन्फेकशन तसेच अल्सर कमी करण्यास मदत करते. 
  • हाडाना मजबूत करते – च्यवनप्राश च्या नियमित सेवनाने शरीरातील केल्सियम चे शोषण आणि प्रोटीन संश्लेषण होते जे हाडाना मजबूती देण्यास मदत करते. याकरिता च्यवनप्राश दुधासह घ्यावा.
  • तारुण्य टिकविणे – आवळा हे वयस्थापन करणारे द्रव्य असून वय वाढत असताना होणारी शरीराची झीज यामुळे रोखली जाते.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारते – यातील त्रिफळा, यष्टीमधू, तूप अष्टवर्ग यामुळे डोळ्यांना बळ मिळते तसेच डोळ्यांचा दाह, डोळ्यातून पाणी येणे,नजर सुधारणे यासाठी च्यवनप्राश उत्तमरीत्या काम करते.
  • मेंदूचे कार्य सुधारते – आवळा, ब्रमही, यष्टीमधू, अश्वगंधा यासारखी द्रव्ये स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात. आकलन क्षमता वाढते आणि नवीन शिकण्याची क्षमता सुधारते.
  • दमा – अलर्जी – श्वसनाच्या तक्रारी –आवळा, पिंपळी, कपूरकचरी, सुंठ यासारखी द्रव्ये फुफुसांची कार्यक्षमता वाढवितात तसेच अलर्जी दमा यामुळे फुफुसाना येणारे दोर्बल्य कमी करते. नवीन पेशींची निर्मिती करते. इन्फेकशन चे प्रमाण कमी करते.

च्यवनप्राश कधी व कसा घ्यावा :

  • च्यवनप्राश नेहमी सकाळी उपाशीपोटी घ्यावा
  • यानंतर 1 ग्लास भर दूध घ्यावे
  • हे घेतल्यानंतर कोणताही मसालेदार अथवा तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नये
  • दूध चालत नसल्यास कोमट पाण्यासह सुद्धा चालेल
  • च्यवनप्राश चपाती सह घेतल्यास ही चालतो.

प्रमाण –१- २ चमचे रोज सकाळी (साधारण १०-२० ग्राम)

कोणी घेउ नये  

  • गर्भवती महिला
  • मधुमेही (डायबीटीस) रुग्ण
  • तोंडतील अल्सर असताना अथवा गरमीचा कोणताही त्रास असल्यास वैद्यांच्या सल्ल्याने घेणे.
  • लहान मुलांना वैद्यांच्या सल्ल्यानेच प्रमाण ठरवून देणे .

Chyavanprash Gold

बाजारात अनेक प्रकारचे च्यवनप्राश उपलब्ध असतात. यामध्ये शास्त्रसुद्ध पद्धतीने व वैद्यांच्या देखरेखीखाली बनवलेला च्यवनप्राश उत्तम आहे.

टीप : आपल्या प्रकृती आणि दोषानुसार याचे प्रमाण व अनुपान हे बदलत असते, याकरिता तज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानुसार च याचा वापर करावा.

 

मग आहे न अगदी योग्य, पौष्टिक, आणि रसायन पूर्ण असा हा जॅम उपयुक्त बाहेरच्या जॅम पेक्षा,

मग आपण कधी चालू करताय

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

कथा एका च्यवनप्राश जॅम ची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *