हल्ली Liver detox अथवा Colon detox बऱ्याच प्रमाणात आपण ऐकतो. विरेचन हे एक प्रकारचे liver अथवा colon detox आपण म्हणू शकतो, कारण विरेचनामुळे यकृत व आतडयातील सर्व दोष (toxins) बाहेर पडतात.
यकृत हा आयुर्वेद नुसार पित्त आणि रक्तशी संलग्न असा अवयव आहे. पित्त आणि रक्त हे आश्रयाश्रयी आहेत आणि पित्त व रक्त दोषाला शरीराबाहेर काढण्यासाठी विरेचन हे अत्यंत उपयुक्त आहे.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर पोट साफ करणे अथवा जुलाब होण्यासाठी केलेले कर्म. विरेचन अथवा वमन अशी कर्मे केल्यानंतर पोटातून दिलेली औषधे ही लवकर आणि चांगल्या प्रकारे लागू पडतात.
म्हणजे आधीच पोटात साठलेला कचरा साफ करून घेतला तर शरीराची acceptancy आणि रोगाशी लढण्याची रोग प्रतिकार क्षमता वाढते.
Table of Contents
विरेचन म्हणजे काय ?
पंचकर्म म्हणजे शोधन चिकित्सा होय. जे दोष अतिरिक्त प्रमाणात शरीरामद्धे वाढतात त्या दोषांना शरीरा बाहेर काढण्यासाठी त्या दोषानुसार पंचकर्म चिकित्सा केली जाते. शरीरातील पित्त दोष आणि त्याच्या अनुषंगाने राहणाऱ्या रक्त दोषाला कमी करण्यासाठी विरेचन ही चिकित्सा अतिशय महत्वपूर्ण ठरते.
आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सा पद्धतीमधील एक अत्यंत महत्वपूर्ण चिकित्सा म्हणजे विरेचन.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर विरेचन म्हणजे आजारानुरूप औषधे देऊन जुलाब / रेचन करणे (purgation treatment). शास्त्रोक्त पद्धतीने जुलाब घडवून आणणे म्हणजे विरेचन यामध्ये केवळ शौचाच्या मार्गाने मळ बाहेर काढणे अभिप्रेत नसून जुलाबाद्वारे शरीरातील वाढलेले दोष बाहेर काढणे अपेक्षित आहे.
आपले शरीर हे पंच-महाभूतांपासून बनलेले आहे आणि यानुसार यामध्ये तीन दोष आढळून येतात जसे की, वात, पित्त आणि कफ. प्रत्येक दोषासाठी एक विशिष्ट चिकित्सा वर्णन केली गेली आहे जसे की, वात दोषासाठी बस्ती, पित्त दोषासाठी विरेचन आणि कफ दोषासाठी वमन.
पित्त आणि रक्त ही नेहमी एकमेकांशी संलग्न असतात जसे दुष्ट पित्त वाढेल तसे रक्त खराब होऊ लागते आणि म्हणूनच विरेचनांचे कार्य हे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषाना साम्यावस्थेत आणायचे काम करते.
विरेचनांचे प्रकार :-
- स्निग्ध विरेचन – स्निग्ध म्हणजे तेलाच्या सहाय्याने केलेले विरेचन पित्त-वात संबधित व्याधीसाठी स्निग्ध विरेचन द्यावे. जसे की, एरंडेल तेल हरीतकी सह.
- रुक्ष विरेचन – जेव्हा पित्त दोष हा कफ दोषाशी संबधित व्याधी उत्पन्न करतो त्यावेळी रुक्ष विरेचन योजावे. जसे की, त्रिवृत लेह.
विरेचन का करावे ?
शोधनाने (पंचकर्माने) शरीर स्वच्छ करून घेतल्यास घेतलेली औषधे अधिक जलदरित्या काम करतात. शरीरातील दोष हे वेगवेगळ्या स्त्रोतसात अथवा मळात अडकलेले असतात त्यांना खेचून बाहेर काढण्यासाठी आणि स्वस्थ राहण्यासाठी पंचकर्म करावेत.
पित्त दोष = अग्नि + जल तत्व प्रधान
शरीरात वात पित्त आणि कफ दोष आहे हे आपण जाणतो. यातील पित्त दोष म्हणजे साक्षात आपल्या पोटातील अग्नि. आपल्या संपूर्ण शरीरामद्धे पित्त दोष आहे जसे, पोटात, त्वचेमद्धे, डोळ्यांमध्ये उदाहरण द्यायचे झाले तर जसे, कोणताही वेगळा पदार्थ खालल्यास लोकाना अंगावर गांधी / फोड उठतात हे पित्त दोषाश्रित रक्तमुळे होते.
अवेळी खाणे, दूषित अथवा शिळे अन्न खाणे, जंक फूड अथवा सतत बाहेरचे अथवा बेकरीचे पदार्थ खाणे, अतिशय तिखट अथवा तेलकट पदार्थ खाणे यामुळे शरीरातील खराब पित्त वाढून इतर आजार सुरू होतात. या दूषित पित्ताला बाहेर काढण्यासाठी विरेचन ही एक उपयुक्त चिकित्सा आहे.
कितीही antacids अथवा पित्ताशमन करणारी औषधे सतत घेण्यापेक्षा आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखाली केलेले विरेचन दूषित पित्ताचा नाश करते.
विरेचन केव्हा करावे?
शरद ऋतु मध्ये नेहमी विरेचंन ही चिकित्सा केली जाते. शरद ऋतुत म्हणजेच सप्टेंबर, ऑक्टोबर महिना हा निसर्गत: पित्तप्रकोपचा काळ असतो. वर्षा ऋतुत संचित झालेले पित्त हे ऑक्टोबरच्या उष्णतेमुळे पातळ होऊन अम्लपित्त, त्वचा रोग, डोकेदुखी, गोवर, कांजिण्या, डोक्याचे / केसांचे विकार इ. पित्ताचे विकार उत्पन्न करते.
विरेचन कोणी घ्यावे ? विरेचनाचे फायदे काय आहेत?
विरेचन हे लहानापासून मोठ्यानपर्यंत अवस्थेनुसार कोणीही घेऊ शकते. यासाठी तज्ञ वैद्यचा सल्ला घ्यावा.
विरेचनाने शरीरातील दूषित पित्त आणि पित्ताशी संबंधित रक्त शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होते. पित्ताशी संबंधित सर्व विकारांकरीता विरेचन अत्यंत उपयुक्त आहे. पित्त आणि रक्ताच्या संबंधित सर्व आजारांकरीता विरेचन फलदायी चिकित्सा आहे.
- कावीळ (Jaundice)
- अम्लपित्त (Acidity)
- ज्वर (Fever)
- डोकेदुखी (Headache) – मायग्रेन, सूर्यावर्त (सूर्य वर येऊ लागल्यास)
- त्वचेचे विकार (Skin diseases) – सोरियसिस, पांढरे डाग, अंगावर गांधी उठणे, eczema, इसब, गळू, खाज इ.
- उच्च रक्तदाब (Hypertension)
- ऊर्ध्वग रक्तपित्त (Epistaxis)
- हाय कोलेस्टेरोल (Hyper Lipidemia)
- अकाली केस पांढरे होणे (Premature graying of hair)
- हृदरोग (Heart disease)
- डोळ्यांचे विकार (Eye problems)
- वजन वाढणे (Obesity)
- वंध्यत्व (Infertility)
- नगिन (Herpes)
- यकृताचे आजार (Liver disease)
- जलोदर (Ascites)
- मधुमेह (Diabetes)
- गर्भाशयातील गाठी (Uterine fibroids)
कॅन्सर , एड्स यासारख्या दुर्धर व्याधीसाठी – केमोथेरेपी अथवा radiation घेत असल्यास विरेचणणे होणार दाह आणि त्याचे होणारे साइड इफेक्ट कमी होतात. राग अथवा क्रोध, मानसिक ताण-तणाव कमी होण्यासाहि आयुर्वेदातील शिरोधारा, बस्ती आणि विरेचन खूप सुंदर कम करते असा आमचा अनुभव आहे.
विरेचन कसे करावे ?
विरेचन देण्यापूर्वी घृतपान म्हणजे स्नेहन करणे महत्वाचे असते, याकरिता औषधीयुक्त तूप वर्धमान मात्रेत घेण्यास सांगितले जाते. म्हणजे त्याने जठर, आतडे यांना मृदुता (lubrication) येऊन नंतर विरेचक औषध घेतल्यास दोष व्यवस्थितरित्या शरीराबाहेर पडतात.
- पूर्वकर्म – रुग्णास 3 दिवस पाचन औषध दिले जाते यानंतर व्यक्तीच्या प्रकृती आणि व्याधिनुसार स्नेहनासाठी औषधी घृतपान केले जाते. याचा डोस प्रकृती आणि पचनशक्ति नुसार बदलतो.साधारण 3 दिवस घृतपान केल्यानंतर 3 दिवस बाह्य स्नेहण स्वेदन म्हणजेच औषधी तेलाने 45 ते 50 मिनिटे अभ्यंग व औषधी काढयाने स्वेदन (स्टीमबाथ) केले जाते.
- प्रधान कर्म– स्नेहण स्वेदन झाल्यानंतर विरेचनाच्या दिवशी सकाळी जुलाबाचे औषध देऊन नियंत्रित पद्धतीने जुलाब घडवून आणले जातात. पूर्वकर्मामुळे आमशयामध्ये जमलेले पित्त दोष यामुळे पूर्णत: शरीराबाहेर काढले जाते. साधारण 10-20 वेग किवा व्यक्तीच्या शक्तिनुसार जुलाब घडवून आणले जातात.
- पश्चात कर्म – विरेचनामुळे शरीरास थकवा येतो. यासाठी नंतर 2 दिवस आराम करणे योग्य. तसेच विरेचनामुळे पचन शक्ति देखील कमी होते म्हणून ती हळूहळू वाढविण्यासाठी आहार योग्य प्रमाणात व पंचवयास हलका असा घ्यावा. यालाच संसर्जन क्रम असे म्हणतात. यामध्ये भाताच्या पेजे पासून सुरुवात करून हळू हळू 3 ते 4 दिवसात पूर्वीच्या आहारापर्यंत यावे लागते. पोटातील अग्नि पूर्ववत करून च आहार योजला जातो.
विरेचन कोणी घेऊ नये?
गर्भिणी किवा स्तनपान करणाऱ्या माता यांनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार विरेचन घ्यावे. नूतन ज्वर, रक्ती आव, रक्ती मूळव्याध, जुलाब अथवा आव पडणे, निरूह बस्ती घेतलेले व्यक्ति, हीन पचन शक्ति.
विरेचन करण्यासाठी कोणती औषधे द्यावीत?
- एरंडेल तेल
- अभयादी मोदक
- त्रिफळा चूर्ण किवा हिरडा चूर्ण
- गंधर्व हरीतकी चूर्ण
- अविपत्तिकर चूर्ण
- इच्छाभेदी
- अश्वकंचुकी रस
विरेचन झाल्याची सम्यक लक्षणे कोणती?
- शरीरामद्धे हलकेपणा जाणवणे
- इंद्रियां मध्ये लाघवता
- रोगाचे प्रतिगमन
- दोषाचे शमन
- हृदयामध्ये लघुता
- वेळेवर भूक आणि तहान लागणे
- गसेस कमी होणे
- शौचाला वेळेवर होणे
|| शरीर शुद्धीचे कारण, करावे रेचण, निरोगी ठेवावे तन-मन ||
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |