हॅलो, हाय सोडा, नमस्ते बोला…. !!
आपण सगळे पाहतोय कोरोना ने सगळीकडे धुमाकूळ घातलाय.
मी कोरोना चे आभार मानते, कारण आज कोरोना मुळे आपल्या भारतीय संस्कृतीला एका उच्च कोटी स्थानावर नेऊन ठेवलय.
एका भारतीयाला यापेक्षा अभिमानास्पद अजून काय असेल हो ?
परवाच बातम्या मध्ये सांगत होते बर्याच देशाचे पंतप्रधान, मंत्री, हात न मिळवता एकमेकांना नमस्ते करताना दिसतात. याचं कारण कोरोनाचा प्रसार थांबवणे आणि यासाठी ते भारतीय संस्कृति आत्मसात करत आहेत.
१.३७ अब्ज लोकसंख्या असलेल्या विशाल भारतात वेगवेगळ्या संस्कृति, वेगवेगळे धर्म ,वेगवेगळ्या जाती, व भाषा बोलल्या जातात परंतु या विविधतेमध्ये “एकता” हेच आपल्या देशाचे वैशिष्ट आहे.
काय आहे ह्या नमस्ते चा अर्थ :
नमः + ते = तुमच्यामध्ये असलेल्या त्या अद्भुत शक्तीला माझा प्रणाम.
नमस्ते, नमस्कार, प्रणाम हे सगळे एकरार्थी शब्द.
पद्धती :-
आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नमस्ते कसे करायचे,
दोन्ही हात एकमेकांना जोडून सगळी हाताची बोटे एकमेकांना जोडून किंचित मान झुकवून आपण नेहमी आपल्याकडे येणार्या आपल्या पाहुण्यांचे स्वागत करतो.
जोडलेले हे हात आपण एक तर आपल्या हृदयाजवळ ठेवतो अन्यथा आपल्या दोन भुवयामध्ये.
पण ह्यामागचं शास्त्रीय कारण आपल्याला माहिती आहे का ?
आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या हाताच्या पाचही बोटांमद्धे पंचमहाभूतांचे स्थान आहे.(पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश)
जेव्हा आपण आपले हात जोडतो, त्यावेळी आपल्या या बोटांचा आणि हाताचा एकमेकावर दाब पडून ही पंचमहाभूते सक्रिय होतात. व
“जे पिंडी ते ब्रह्मांडी” (जे निसर्गता आढळते तेच या शरीरात पण आहे) या न्यायाने पंचमहाभुतातून आपल्या शरीरात एक ऊर्जा निर्मित होते.
ह्याच नमस्ते मुद्रेला अंजली मुद्रा असेही म्हणले जाते.
फायदे :-
- तर्क, अंतर्ज्ञान, आणि सामर्थ्य यांचा समन्वय साधला जातो॰
- अतिरिक्त ताणतणाव आणि चिंता दूर करणे.
- मेंदूतील डाव्या आणि उजव्या भागाला संतुलित ठेवणे.
- ध्यान– साधनेसाठी व एकाग्रतेसाठी उपयुक्त.
- हृदया चक्र (अनाहत चक्र) सक्रिय करण्याकरिता.
- आज्ञा चक्र सक्रिय करण्याकरिता
- रागावर नियंत्रण ठेवते
- सर्व चिंता दूर करते
- मन: शांति मिळवण्यासाठी.
- अहंकार आणि नकारात्मकता दूर करते॰
- आपल्यातील दैवी ऊर्जा अनुभवण्यास मदत करते॰
- शरीरातील स्त्री-शक्ति आणि पुरुष-शक्ति चा समन्वय साधते॰
- शरीरातील व्याधी, दोष कमी करण्यास मदत करते॰
- हातावर आलेल्या दबावामुळे शरीरातील अवयवावर व्याधी नष्ट करण्यास फायदा होतो.
इतक्या सुंदर आपल्या संस्कृति मध्ये आपण अतिथि देवो भव: ||
म्हणजे आपल्या पाहुण्यांना देव मानून त्यांची काळजी घेतो यातून एक यजमान आणि पाहुण्यांच एक सुंदर नात पाहायला मिळते.
नमस्ते हे सभ्यतेचा सन्मान व्यक्त करते आणि एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीच्या आदरातिथ्य संबोधन करते.
शेकडो वर्षापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत नमस्ते म्हणून लोकांचा सन्मान करणे, गाईची पुजा करणे, शाकाहारी अन्नाचे जास्तीत जास्त सेवन करणे, पुजा व्रत नियम करणे, उपवास करणे , तुळस अंगणात लावून तिची पुजा करणे, मोठ्यांचा आदर करणे, बाहेरून घरात आल्यावर हातपाय धुणे,दशक्रिया विधी वरून आल्यावर आंघोळ करणे.
याची दखल आता परदेशी घेत आहेत आणि वापरत आहेत. हेच भारताचे एकता आणि सामर्थ्य आहे.
भारतामध्ये अजून दोन वैशिष्ट आहेत :योगा आणि आयुर्वेद
योगा सुरू आणि शेवट करताना नेहमी नमस्ते नावाचा उच्चार केला जातो.
खूप योगासनांमध्ये नमस्ते मुद्रेचाही वापर दिसून येतो त्यातील काही आसने पुढीलप्रमाणे आहेत.:
- सूर्य-नमस्कार
- ताडासन / समस्थिति
- वृक्षासन
- वीरभद्रासन
- पार्श्वउत्थानासन
- प्रसारित पादोत्तनासन
- उत्कटासन
- पद्मासन
- दुर्वासन
- व्दिपाद शीर्षासन
- कंदासन
- समकोनासन
- मत्स्यासन
- अंजनेयासन
मग आता विसरू नका भारताची ताकद आणि संस्कृती
नमस्ते बोला ! नमस्ते बोलायला शिकवा !!
“एक भारत, श्रेष्ठ भारत”||
!! नमस्ते !!
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |